Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    लातुरात मोठे उद्योग व रोजगार निर्मितीसाठी* *सक्षम नेतृत्व आ.अमित देशमुख यांना साथ* *द्या-माजी खा.सुधाकर शृंगारे*



     लातुरात मोठे उद्योग व रोजगार निर्मितीसाठी* *सक्षम नेतृत्व आ.अमित देशमुख यांना साथ* *द्या-माजी खा.सुधाकर शृंगारे*


    *लातुरात मोठे उद्योग व रोजगार निर्मितीसाठी* *सक्षम नेतृत्व आ.अमित
    देशमुख यांना साथ* *द्या-माजी खा.सुधाकर शृंगारे*
    *प्रभाग ३ मधील संवाद बैठकीस नागरिकांसह* *महिलाचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
    *मी स्वतः आ.अमित देशमुख समजून ही निवडणूक* *आपल्या हातात घेण्याचे माजी
    खा.सुधाकर श्रुंगारे* *यांचे आवाहन*

    लातुर प्रतिनिधी-दि.१५ नोव्हेंबर २०२४ (शुक्रवार)
    विधानसभा निवडणूक अनुषंगाने आता प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला असून या
    प्रचारात लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील मविआ काँग्रेस पक्षाचे अधिकृत
    उमेदवार माजी मंत्री आ.अमित विलासराव देशमुख यांनी आघाडी घेतल्याचे चित्र
    सद्या पहावयास मिळत आहे.
    माजी खा.सुधाकर शृंगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत
    शिवसेना (उबाठा) चे सुनील बसपुरे यांच्या पुढाकाराने गुरुवार दि.१४
    नोव्हेंबर रोजी लातूर शहरातील प्रभाग क्र.३ मधील शाहू नगर भागातल्या
    बालाजी जाधव यांच्या निवासस्थानी संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती या
    बैठकीस प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
    यावेळी बोलताना माजी खा.सुधाकर शृंगारे म्हणाले की,मागील निवडणुकीत मी
    भाजप सोबत होतो मात्र आज सर्व धर्म समभाव जोपासणाऱ्या,भारतीय संविधानाचा
    आदर सन्मान करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या सोबत आहे.भाजपा मध्ये
    सर्वसामान्य नागरिक तसेच मागासवर्गीय यांना दुय्यम वागणूक मिळते ज्याचा
    मी स्वतः माझ्या मागील ५ वर्षातील खासदारकीच्या काळात अनुभव  घेतला आहे
    आणि यामुळेच मी भाजप सोडून अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये
    नुकताच पक्ष प्रवेश केला. आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख यांच्या
    स्वप्नातले लातूर आपल्याला बनवायचे असून यासाठी लातूरचे काँग्रेस
    नेतृत्व,सर्व जाती धर्मांना एकत्र सोबत घेऊन चालणारे आ.अमित देशमुख यांना
    आपण या पूर्वी साथ दिली आणि आता या निवडणुकीत व यापुढे देखील आपली साथ
    त्यांना कायम मिळत राहावी. लातूरचा जो काही विकास झाला आहे तो काँग्रेस
    पक्षाने केला असून आ.अमित देशमुख हे नव्या पिढीचे काँग्रेसचे नेतृत्व
    असून हे आपण लातूरकरानी जपायला हवे, त्यांच्याकडे आधुनिक विकासाचा
    दृष्टिकोन देखील आहे हे पाहता संबंध महाराष्ट्र त्यांच्याकडे आज नेता
    म्हणून पाहत आहे.
    राज्यातील जनभावना लक्षात घेत काँग्रेस पक्षाने देखील त्यांना या
    विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक केले ज्यामुळे ते निवडणूक प्रचारार्थ
    राज्यभर दौरे करून मविआ च्या उमेदवारांच्या प्रचार सभा घेत आहेत यामुळे
    आपण लातूरकरानी ही निवडणूक आपल्या हातात घेऊन मी स्वतः अमित देशमुख आहे
    असे समजून प्रचारात उतरावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
    पुढे बोलताना ते म्हणाले की,लातूरला अधिक गतीने पुढे नेण्यासाठी आपणाला
    आ.अमित देशमुख यांच्या पाठीशी मतरुपी मोठी ताकद उभी करावी लागेल अधिकचे
    बळ द्यावे लागेल आपण सर्वांनी त्यांना सर्वाधिक मताधिक्य दिले तर
    येणाऱ्या काळात त्यांना पक्षात मोठी जबाबदारी मिळेल आणि आपल्याला लातूर
    करिता मोठे उद्योग आणता येतील ज्यातून रोजगार निर्मिती होईल व आपल्या
    लातूरच्या युवकांना कुटुंब सोडून पुणे-मुंबई सारख्या शहराकडे रोजगाराच्या
    शोधात जावे लागणार नाही.
    आता तर खासदार सुध्दा आपल्या पक्षाचे आहेत यामुळे केंद्राच्या व
    राज्याच्या नवनवीन चांगल्या योजना लातुर मध्ये आणून लातूरचा सर्वांगीण
    विकास आणखी चांगल्या प्रकारे होईल याचा विचार प्रत्येक मतदाराने करावा व
    आपल्या येणाऱ्या पिढीसाठी सक्षम नेतृत्व असलेले आ.अमित देशमुख यांना
    प्रचंड मतांनी विजयी करावे असेही आवाहन माजी खा.सुधाकर शृंगारे यांनी
    उपस्थिताना केले.
    या बैठकीस प्रा.सुधीर अनवले,शेकापचे ऍड.उदय गवारे, कामगार नेते राजकुमार
    होळीकर,माजी मनपा  सदस्य विजयकुमार साबदे,वर्षाताई मस्के, ऍड.अंगद
    गायकवाड,मागासवर्गीय विभाग अध्यक्ष प्रा.प्रवीण कांबळे यांच्यासह रामराजे
    निंबाळकर,शिवाजी कांबळे,राहुल डुमणे,राजू गवळी,तनुजा कांबळे,अशोक
    सूर्यवंशी, काशिनाथ वाघमारे,आशुतोष मुळे,अमोल गायकवाड, विशाल
    सूर्यवंशी,नूतन हनुमंते तसेच प्रभाग क्र. ३ मधील आजी माजी नगरसेवक,
    महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे पदाधिकारी, सदस्य, सर्व बूथ प्रमुख महिला व
    नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad