महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याशेजारी होणारी सभा ऐतिहासिक
- डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकरलातूर/ प्रतिनिधी: महात्मा बसवेश्वर हे सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान आहेत.महामार्गाच्या कामात बसवेश्वरांचा पुतळा येत असताना त्यावर राजकारण झाले पण भाजप शिष्टमंडळाने विनंती केल्यानंतर पुतळा हलला नाही.त्यामुळे या पुतळ्याशेजारी होणारी ही सभा ऐतिहासिक आहे,असे प्रतिपादन भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी केले.
गुरुवारी सायंकाळी महात्मा बसवेश्वर चौकात झालेल्या सभेत डॉ.अर्चनाताई पाटील बोलत होत्या.या ऐतिहासिक सभेस माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ॲड.व्यंकट बेद्रे,भाजपा शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे,माजी जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन दाने,राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, डॉ.भातांब्रे,युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर,बाबू खंदाडे,बाबासाहेब कोरे,डी.एल.कांबळे,जितेंद्र बनसोडे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ.अर्चनाताई पाटील म्हणाल्या की,महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात येत होता.त्यावेळी त्यावरून राजकारण करण्यात आले.सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हलवू नये.राष्ट्रीय महामार्ग त्याच्या बाजूने जावा यासाठी भाजपाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.ती विनंती मान्य झाली.यामुळे महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हलला नाही.त्याच चौकात आज ही सभा होत आहे.त्यामुळे ही सभा ऐतिहासिक ठरणार आहे, असेही अर्चनाताई पाटील म्हणाल्या.
ताईंनी सांगितले की, राज्यातील सर्व लाडक्या बहिणी महायुतीच्या सोबत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात महायुतीची सत्ता येणारच आहे.लातुरात विरोधक अपप्रचार करत आहेत. त्यांच्याकडे कर्तृत्व नाही. पदयात्रेत पूर्वजांचे फोटो घेऊन ते फिरत आहेत परंतु आता त्याचा फायदा होणार नसल्याचे ताई म्हणाल्या.
भाजपाने आपल्या वचननाम्यात लाडक्या बहिणींसाठी दिला जाणारा निधी १५०० रुपयावरून २१०० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून बहिणींच्या खात्यात अधिक रक्कम जमा होणार असल्याचेही डॉ.अर्चनाताई पाटील म्हणाल्या.
यावेळी सचिन दाने,अजित पाटील कव्हेकर,प्रशांत पाटील यांनीही विचार मांडत डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
या सभेस शहर मतदारसंघातील भाजपा व महायुतीचे पदाधिकारी,कार्यकर्ते, नागरिक व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment