Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    मुस्लिम समाजाने आणि ओबीसी बांधवांनी वंचितच्या उमेदवाराच्या पाठीशी राहावे.



     मुस्लिम समाजाने आणि ओबीसी बांधवांनी वंचितच्या उमेदवाराच्या पाठीशी राहावे.

    - ऍड. प्रकाश आंबेडकर यांचे लातूरच्या अभूतपूर्व विराट सभेत आवाहन
    - उमेदवार विनोद खटके यांची ताकद वाढली, ऐतिहासिक विजयाची नांदी

    लातूर :  पंधरा दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला. त्यात स्थानिक
    व ग्रामीण भागात निवडणुका पार पाडत असताना ओबीसीना आरक्षण राहणार नाही.
    कुटुंबात एकाने आरक्षणाचा लाभ घेतला तर इतरांना घेता येणार नाही. जन गणना
    झाली नसल्याने डेटा उपलब्ध नसल्याचे कारण दिले आहे. नवीन विधानसभा गठीत
    झाल्यानंतर ठराव घेण्यात येईल. त्याला काँग्रेस पासून भाजपची मान्यता
    आहे.  तुम्ही आरक्षणाच्या यादीतून किक आउट होसाल.  हा निर्णय ज्यांना
    मान्य असेल ते भाजप आणि काँग्रेसला मतदान करतील, ज्यांना मान्य नाही
    त्यांनी वंचितच्या उमेदवारांना मतदान करावे, नुसतं मतदान करून चालणार
    नाही, निवडून आणावे लागेल. त्यामुळे उद्याचे आरक्षण टिकवता येईल. असे
    आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी
    लातूर येथील विराट सभेत केले.
    लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विनोद खटके
    व   लातूर ग्रामीणचे डॉ. विजय अजनीकर, निलंगा येथून मंजुषा निंबाळकर,
    उदगीर मधून प्रा. शिवाजीराव बेवनाळे, औसा येथील कुमार शिवाजी यांच्या
    प्रचारार्थ लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे ऍड. प्रकाश
    आंबेडकर यांच्या विराट सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत
    होते.
    काँग्रेस नेते राहुल गांधी हे जनतेला फसवत आहेत. मागच्या वेळी संविधान व
    लोकशाहीचा सार्वत्रिक इश्यू केला.  संविधानतील समतेचा मार्ग आरक्षणाच्या
    माध्यमातून जातो. तो मार्गच संपवला जातोय. हे सगळं थांबवण्यासाठी वंचितचे
    उमेदवार विजयी होणे गरजेचे आहे.
    मुस्लिम बांधवावर मागील पाच वर्षात एनआरसी, औरंगजेब, टिपू सुलतान व
    मशिदीच्या स्टेट्स वरून मुस्लिम समाजावर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले.
    आम्ही औरंजेबच्या मजारवर चादर चढवली आणि हल्ले बंद झाले. त्यावेळी वंचित
    बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी उभी राहिली. आता मुस्लिमांनी वंचितच्या
    उमेदवारांच्या मागे उभे राहिले पाहिजे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे सेना आणि
    एकनाथ शिंदेची शिव सेना यांच्या भाषणात बाबरी मशीद शहीद केल्याचे
    अभिमानाने सांगितले जाते. तरीही मौलवी आणि उल्लेमा वंचितला पाठिंबा देत
    नाहीत. संधी निघून गेली की पाठ फिरवतात.
    उद्याच्या पिढीचे अधिकार, मान सन्मान, त्यांचं स्वातंत्र्य हे गॅस
    सिलिंडरला मतदान करून आबाधित ठेवा. वंचितच्या सर्व उमेदवारांना निवडून
    द्या. असे आवाहन ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले. या सभेला
    लाखोंच्या संख्येने  जनसमुदाय उपस्थित होता. प्रकाश आंबेडकर यांना दहा
    मिनिट बोलण्याची त्यांच्या डॉक्टरांनी परवानगी दिली होती. म्हणून ते
    जास्त वेळ बोलू शकले नाही. व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडीचे लातूर शहर
    विधानसभा मतदासंघातील उमेदवार विनोद खटके,  निलंग्यांच्या उमेदवार
    मंजुषाताई निंबाळकर, उदगीरचे उमेदवार प्रा. शिवाजीराव बेवनाळे, औसाचे
    उमेदवार कुमार शिवाजीराव, लातूर ग्रामीणचे उमेदवार डॉ. विजय अजनीकर,
    वंचितचे जिल्हाध्यक्ष सलीमभाई सय्यद, जिल्हा प्रभारी रमेश गायकवाड,
    मराठवाडा महासचिव संतोष सूर्यवंशी,  जिल्हा महासचिव संतोष सोमवंशी,
    जिल्हा संघटक सचिन लामतुरे, शहराध्यक्ष सचिन गायकवाड,  महिला शहराध्यक्ष
    सुजाता अजनीकर, महंमद शफी, रिपब्लिकन सेनेचे प्रा. युवराज धसवाडीकर,
    हत्तीमभाई शेख, बालाजी कांबळे, जिल्हा महासचिव ऍड. रोहित सोमवंशी, युवा
    शहराध्यक्ष महेंद्र बनसोडे,  युवा जिल्हाध्यक्ष युवराज जोगी, जिल्हा
    महासचिव नितीन गायकवाड,  कामगारा आघाडी जिल्हाध्यक्ष अमोल बनसोडे आनंद
    जाधव आदींची उपस्थिती होती. या सभेला लाखोंच्या संख्येने जनसमुदाय
    उपस्थित होता.

    वंचितची विराट सभा पाहून भल्या भल्याना घाम फुटला असेल : विनोद खटके

    ऍड. प्रकाश आंबेडकर आजारी असतानाही लातूरच्या सभेला उपस्थित राहुन
    आम्हाला ताकद दिली. ही विराट सभा पाहून आज भल्या भल्याना घाम फुटला असेल.
    वंचितला कमी लेखणाऱ्यांना वंचितची ताकद कळली असेल. लातूरच्या जनतेने आज
    ताकद दाखूवून दिली आहे. जनता गुलामीत राहणार नाही. लातूर शहर कचरामय
    झालेले आहे. येत्या 20 तारखेला जनता प्रस्थापिताना  कचऱ्यात घातल्या
    शिवाय राहणार नाही. सद्याचे आमदार कुणाचाही कधी फोन उचलत नाहीत. ते सोडा
    त्यांचा पीए देखील फोन उचलत नाही. लोकांची कामे कशी होणार? आमच्याकडे एक
    कॉल प्रॉब्लम सॉल. माझ्या विरोधात एका बाजूला माजी मुख्यमंत्र्याचा
    मुलगा, दुसऱ्या बाजूला माजी केंद्रिय गृह मंत्र्याच्या सुनबाई उभ्या
    आहेत. आणि मी वंचित कडून मजुराचा मुलगा आहे.हा अधीकार केवळ डॉ. बाबासाहेब
    आंबेडकर यांच्या संविधानाची आहे आहे.

    पत्रकारांना धमक्या दिल्या तर खबरदार!

    वृत्तपत्र, साप्ताहिक आणि शोसल मीडियाच्या पत्रकारांना प्रस्तापित
    आमदारांनी धमक्या दिल्या तर खबरदार. कुणाला धमकी आली तर तात्काळ मला फोन
    करा.. आंबेडकर चौकात माझं ऑफिस आहे. हुकूमशाही किंवा मोगलाई नाही. ही
    लोकशाही आहे. असा इशारा उमेदवार विनोद खटके यांनी भर सभेत दिला.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad