वंचितचे उमेदवार विनोद खटके यांच्या प्रचारार्थ कातपूर येथील महा परिवर्तन यात्रेला उदंड प्रतिसाद
वंचितचे उमेदवार विनोद खटके यांच्या प्रचारार्थ कातपूर येथील महा
परिवर्तन यात्रेला उदंड प्रतिसादलातूर : लातूर विधानसभा मतदार संघातील वंचित बहूजन आघाडीचे अधिकृत
उमेदवार विनोद खटके यांच्या प्रचारार्थ आज 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 9
वाजता महापरिवर्तन यात्रा काढण्यात आली. या महपरिवर्तन यात्रेला उदंड
प्रतिसाद मिळाला.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सलीमभाई सय्यद, महमद शफी, आनंद जाधव,
संतोष सोमवंशी, बालाजी कांबळे, वैजनाथ माने, नितीन गायकवाड, आबासाहेब
गायकवाड, राजकुमार सोनकांबळे, लालासाहेब सावळे आदींची उपस्थिती होती.
अनेक ठिकाणी जिल्हाध्यक्ष सलीमभाई सय्यद यांचे महिला भगिनींनी औक्षण
केले. या महा परिवर्तन यात्रेत हजारोच्या संख्येने विविध जाती धर्माचे
नागरिक, महिला अबाल थोर सहभागी होते. कातपूरच्या गल्ली बोळातील घरोघरी
जाऊन विनोद खटके यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
No comments