Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मतदार जनजागृती रॅली शहरातील सर्व मतदारानी मतदान करावे – आयुक्त बाबासाहेब मनोहरे



     लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मतदार जनजागृती रॅली

    शहरातील सर्व मतदारानी मतदान करावे – आयुक्त बाबासाहेब मनोहरे

    लातूर/प्रतिनिधी:लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने आज दिनांक ०८/११/२०२४ रोजी आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांचे मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती रॅली गांधी चौक ते क्रीडा संकुल पर्यंत आयोजित करण्यात आली .

    सकाळी ८ वाजता गांधी चौक येथे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांचे उपस्थितीमध्ये रॅलीस सुरुवात करण्यात आली.  सदर रॅलीमध्ये महिला बचत गटाच्या महिलापथ विक्रेता समितीचे सदस्य व फेरीवालेआशा वर्करशाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी असे एकूण १२०० महिला व पुरुष  सहभागी होते.

                   सदर रॅलीचा समारोप क्रीडा संकुल येथे करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांनी केले यावेळी आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी मार्गदर्शन केले व शहरातील सर्व मतदारानी येणाऱ्या २० नोव्हेंबर रोजी आपल्या बुथवर जाऊन स्वतः व कुटुंबातील सर्व सदस्यांचे मतदान करून घ्यावे तसेच ज्या मतदारांचे वय ८५ पेक्षा जास्त अशा मतदाराना घरून मतदान करण्याची सोय करण्यात आली असून नवीन मतदार यांनी मिळालेल्या मतदान हक्काचा लाभ घ्यावा व मतदान करावे. गेल्या विधानसभेच्या वेळी झालेल्या मतदान टक्केवारीपेक्षा यावेळी शहरातील मतदारानी मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेतअसे आवाहन केले. यावेळी उपस्थित सर्वाना मतदान करणे बाबत शपथ देण्यात आली. या कार्यक्रमास  मनपा अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हा सह आयुक्त मंगेश शिंदेमुख्य लेखा परीक्षक कांचन तावडेमुख्य लेखाधिकारी रावसाहेब कोलगणेसहायक आयुक्त अजित ढोपेसहायक आयुक्त निर्मला मानेसहायक आयुक्त खदीर शेख सहायक आयुक्त विजय राजुरेसहायक आयुक्त नंदकिशोर तापडे आरोग्य अधिकारी डॉ. शंकर भारतीक्षेत्रीय अधिकारी समाधान सूर्यवंशी स्वछता अधिकारी रमाकांत पिडगेकलीम शेखइतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

                 सदर रॅली यशस्वी करण्यासाठी मनपा शिक्षण अधिकारी साहेबराव जाधवआरोग्य अधिकारी  डॉ. शंकर भारती, DAY- NULM विभागाचे शहर अभियान व्यवस्थापक लक्ष्मण जाधवनितीन सुरवसे समुदाय संघटक विरेन्द्र सातपुते, CRP, यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपी साठे यांनी केले तर आभार प्रदर्शन बालाजी शिंदे यांनी केले. 



    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad