शांघाय नको,स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित लातूर पाहिजे - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर



शांघाय नको,स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित लातूर पाहिजे

  - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

दहशत मोडून काढत लोकशाही स्थापनेसाठी साथ देण्याचे आवाहन

भव्य पदयात्रेने डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या प्रचाराची सांगता

     लातूर/प्रतिनिधी:लातूरकरांना शांघाय नको आहे,त्यांना फक्त स्वच्छ,सुंदर आणि सुरक्षित लातूर पाहिजे."माझं लातूर पाहिजे,आपलं लातूर पाहिजे", आणि ते करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.आपण जिल्ह्यातील पहिली महिला आमदार म्हणून मला निवडून द्या. मी पाच वर्ष तुमची सेवा करीन, अशी भावनिक साद डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी लातूरकरांना घातली.लातुरातील दहशत मोडून काढत लोकशाही स्थापन करण्यासाठी साथ देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
       सोमवारी भव्य पदयात्रेने डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या प्रचाराची सांगता झाली. यानिमित्त आयोजित सभेत डॉ.अर्चनाताई बोलत होत्या. मंचावर माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे,शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे,माजी जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी,गुरुनाथ मगे, शिवसेनेचे जेष्ठ नेते ॲड.बळवंत जाधव,जिल्हाप्रमुख सचिन दाने, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव ॲड.व्यंकट बेद्रे,युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर,महिला मोर्चाच्या रागिनीताई यादव,भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे मोहसीन शेख,शैलेश पाटील चाकूरकर,कुशाग्रसिंह,ॲड. दिग्विजय काथवटे,प्रशांत पाटील,दीपाताई गीते आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.
    डॉ.अर्चनाताई पाटील यांनी प्रचार मोहिमेत सहभागी घेणाऱ्या महायुतीतील प्रत्येक घटकाचे आभार मानले.विशेष करून लाडक्या बहिणी आणि प्रत्येक लातूरकर माझे स्टार प्रचारक आहेत.प्रचारासाठी काढलेल्या पदयात्रेच्या स्टर कॅंपेनर माझ्या लाडक्या बहिणी आहेत.आपण सर्वांनी माझ्यावर प्रेम केले,मला आशीर्वाद दिले.या प्रेमातून उतराई होणे शक्य नाही, असे ताई म्हणाल्या.
     संपूर्ण लातूरकर माझा परिवार आहे.आपली जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे.
लातुरातील दहशत मोडून काढत  इथे लोकशाही आणायची आहे. या निवडणुकीतून महायुतीचा लातूर पॅटर्न घडवू.१९९५  मध्ये शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी लातूर पॅटर्न घडवला होता. आता २०२४ मध्ये नवीन अध्याय लिहिला जाणार आहे.या परिवर्तनाचे आपण साक्षीदार आहात,असे ताई म्हणाल्या.
       लातुरच्या विकासाच्या गप्पा आजवरच्या आमदारांनी मारल्या.
लातुरचे शांघाय करण्याचे आश्वासन दिले पण आपल्याला ते नको आहे.आपले लातूर स्वच्छ,सुंदर व सुरक्षित व्हायला पाहिजे.माझे लातूर,आपले लातूर स्वच्छ असायला हवे.ते काम मी करणार आहे.आपण सर्वजण मिळून विकासाचा नवीन पॅटर्न घडवायचा आहे.हा पॅटर्न एकट्याचा नसेल.इथून पुढे लातूरकर कोणालाही घाबरणार नाहीत.प्रत्येकाला मोकळा श्वास घेता येणार आहे.आजपासून  कोणाचाही व्यक्तिगत विकास होणार नाही तर लातूरचा विकास होईल,असेही ताई म्हणाल्या.
        ही निवडणूक लातूरच्या इतिहासाला आणि विकासाला दिशा देणारी आहे.पहिल्या निवडणुकीत आमदार झाल्यानंतर त्यांच्याकडे एकच कारखाना होता.तीन वेळा आमदार ते झाले.या काळात त्यांच्याकडे १५ कारखाने आहेत. याच्यावरूनच विकास कोणाचा झाला ?  हे लक्षात येते.यापुढे असे होणार नाही.गृह उद्योग करणाऱ्या महिलांसाठी मी ॲमेझॉन ॲप करणार आहे. यातून त्यांना त्यांची उत्पादने जागतिक पातळीवरील विकता येतील,असेही ताई म्हणाल्या.
     लातूरकरांनी मला दिलेला प्रतिसाद पाहता त्यांचे धाबे दणाणले आहेत.आमदार झाल्यानंतर महायुती सरकारच्या माध्यमातून विलासराव देशमुख मार्गाचे सुशोभीकरण करत साहेबांना कार्य श्रद्धांजली अर्पण करणार असल्याचे ताई म्हणाल्या.
     लातूरकरांचा विकास हाच माझा ध्यास आहे.त्यासाठी येणाऱ्या २० तारखेस कमळाचे बटन दाबून आपण माझ्या पाठीशी रहा.मला विधानसभेत पाठवा.मी कायमस्वरूपी आपल्या ऋणात राहीन,असे आवाहनही डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी केले.
     तत्पूर्वी मार्गदर्शन करताना माजी आमदार कहेकर यांनी मोटरसायकलवर फिरणाऱ्या देशमुखांकडे आज स्वतःचे विमान आहे.त्यांनी केवळ स्वतःचा विकास केला.पक्षाशी बेईमानी केली.अशा लोकांना घरी बसवा.डॉ.अर्चनाताई पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन केले.ॲड.व्यंकट बेद्रे यांनी काँग्रेस आता गरिबांची राहिलेली नसल्याचे सांगितले. लातूरचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी डॉ.अर्चनाताई पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन करतानाच जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व ६ जागा विजयी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
    शिवसेनेचे सचिन दाने यांनी आजची रॅली पाहून जनतेने डॉ.
अर्चनाताई पाटील यांना आशीर्वाद दिल्याचे स्पष्ट झाले आहे,असे सांगितले.या प्रतिसादाचे मतदानात रूपांतर व्हावे,अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

 भव्य पदयात्रेने लक्ष वेधले .....
   सभेपूर्वी शहरातील महात्मा गांधी चौकापासून पदयात्रा काढण्यात आली.ही पदयात्रा गांधी चौक,औसा हनुमान, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, सावेवाडी,ओडियाराज चौक खोरी गल्ली शिवाजी चौक या मार्गे जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचली.तेथे सांगता सभा झाली.
    सजवलेल्या वाहनात डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यासह माजी खासदार रूपाताई पाटील,माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर,
देविदास काळे,ॲड.बळवंत जाधव,शैलेश पाटील चाकूरकर,
ॲड.व्यंकट बेद्रे,डी.ई.सोनकांबळे हे नागरिकांचे अभिवादन स्वीकारत होते.
      पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली.औसा हनुमान देवस्थान तसेच वैद्यनाथ देवस्थानच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.बसवेश्वर महाविद्यालया जवळील महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यास डॉ.अर्चनाताई पाटील व मान्यवरांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.डॉ.हंसराज बाहेती,पत्रकार जयप्रकाश दगडे यांनी रुग्णालयासमोर सत्कार केला.शिवाजी चौक येथे विश्वजित गायकवाड यांनीही त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले.शिवाजी चौक येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास डॉ.अर्चनाताई पाटील यांनी पुष्पहार घालत अभिवादन केले.
       ढोल-ताशांचा गजर व
वाद्यांच्या दणदणाटात निघालेल्या या पदयानेने  लातूरकरांचे लक्ष वेधून घेतले.या पदयात्रेमध्ये पारंपारिक वेशभूषा केलेल्या बंजारा समाजाच्या महिलांचे नृत्य लक्षवेधी ठरले.या पदयात्रेत शैलेश गोजमगुंडे, शिवसिंह शिसोदिया,ॲड. दिग्विजय काथवटे,बाबासाहेब कोरे,प्रविण सावंत,सुनिल मलवाड,डॉ.भातंब्रे,शामसुंदर मानधना,शीतल मालू,शिरीष कुलकर्णी,वर्षा कुलकर्णी, लालासाहेब देशमुख,बाबू खंदाडे, शैलेश स्वामी,पृथ्वीसिंह बायस, ओम धरणे,व्यंकट पन्हाळे,संगीत रंदाळे,मनोज सूर्यवंशी,अविनाश कोळी,प्रविण कस्तुरे,रवी सुडे, संतोष पांचाळ,मंगेश बिराजदार, दीपक मठपती,संजय जमदाडे, गणेश गवारे यांच्यासह मतदारसंघातील भाजपा, शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,रिपाई तसेच महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह हजारो नागरिकांनी सहभाग घेतला.

बालकाला आनंदाश्रू अनावर ..
      जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेस उपस्थित हजारो नागरिकांमध्ये एक बालक बसलेले होते. व्यासपीठाच्या अगदी समोरच्या बाजूस बसलेल्या त्या बालकाने संपूर्ण सभेचे निरीक्षण केले. त्यावेळी त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते.हे पाहून सभा संपल्यानंतर त्या बालकाला काहींनी व्यासपीठावर बोलावले. खाली बसत डॉ.अर्चनाताई पाटील यांनी त्याच्याशी संवाद साधताच ते बालक ढसाढसा रडू लागले.ताईंनी त्याला पुष्पहार घातला,त्याच्याशी त्या बोलल्या. कसलीही इच्छा,अपेक्षा नसताना वातावरण पाहून भारावून गेलेल्या त्या बालकाचे आनंदाश्रूच लातूरचा निकाल सांगून जात होते...

Post a Comment

Previous Post Next Post