काँग्रेस व भाजपच्या भुलथापांना बळी पडू नका, स्वाभिमानी व्हा * वंचितचे उमेदवार विनोद खटके यांचे मतदारांना आवाहन




  काँग्रेस व भाजपच्या भुलथापांना बळी पडू नका, स्वाभिमानी व्हा

* वंचितचे उमेदवार विनोद खटके यांचे मतदारांना आवाहन

लातूर : ज्यांचा कलर आणि कॉलर व्हाईट, विनोद खटकेंमुळे झाली त्यांची हवा
टाईट... अशा शब्दात विनोद खटकें यांनी आ. अमित देशमुखांचे नाव घेता
डिवचले आणि त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका, गेल्या वर्षात कसल्याच
प्रकारचा विकास केलेला नाही. पारंपरिक घराणेशाही मोडीत काढून मला
मतपेटीतुन भरघोस आशीर्वाद द्या, असे आवाहन लातूर शहर विधानसभा
मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार विनोद खटकें यांनी
प्रचाराच्या शेवटच्या समारोपिय सभेत केले.
आज पर्यंत प्रस्थापित आमदारांना लातुरचा पाणी प्रश्न सोडवता आला नाही. ना
उजनीचे, ना लिंबोटीचे पाणी आणता आले नाही.  जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न
निधी अभावी खितपत पडला आहे. शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. दर पाच
वर्षांनी येऊन खोटी आश्वासनें दिली जातात. आणि तुमची मते घेतली जातात.
आता त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका. मतपेटीतूनच त्यांची हुकूमशाही,
घराणेशाही मोडीत काढा. असे आवाहन उमेदवार विनोद खटकें यांनी केले.
यावेळी माजी नगरसेवक सचिन मस्के यांचे जोरदार भाषण झाले. प्रस्थापित
आमदार गोंजारवान्या भाषेत धमक्या देत आहेत.  असल्या धमक्याना आम्ही भीक
घालत नसतो.  25 तारखेच्या आधीच 20 तारखेला मतदारच मतपेटीतून त्यांना
त्यांची जागा दाखवतील.
वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर म्हणाल्या,  निवडणूक जनतेने
ताब्यात घेतली की काय होते, याचे प्रत्यक्ष चित्र लातूरमध्ये दिसते आहे.
20 तारखेला संविधानाने दिलेल्या हक्काचा उत्सव आहे. मात्र वंचितच्या
उमेदवारामुळे प्रस्तापित आमदार, सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली
आहे. त्यामुळे धमक्या आणि हल्ले करू लागले आहेत.
यावेळी मंचावर वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर,  सौ. दीक्षाराणी
विनोद खटकें, बौद्धाचार्य केशवराव कांबळे, महंमद शफी, मराठवाडा महासचिव
रमेश गायकवाड, संतोष सोमवंशी, जिल्हाध्यक्ष सलीमभाई सय्यद,  महिला
शहराध्यक्ष सुजाता अजनीकर, शहराध्यक्ष सचिन गायकवाड, अकाल सेनेचे
गुलजीतसिंग जुन्नी, यशवंत बोरीकर, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ
कोरडे, भारतीय बौद्ध महा सभेचे जिल्हाध्यक्ष एम. एम. बलांडे,  प्रा.
युवराज धसवाडीकर, मन्सूरभाई खान, अंनवर भाई शेख, सादिक पटेल, परवेजभाई
सय्यद,  समता आदींची प्रमुख उपस्थिती होती

Post a Comment

Previous Post Next Post