काँग्रेस टिमचे कर्णधार अशोकराव पाटील... अमित देशमुखांनी केली निलंग्यात संघाची घोषणा.
काँग्रेस टिमचे कर्णधार अशोकराव पाटील... अमित देशमुखांनी केली निलंग्यात संघाची घोषणा.
निलंगा : निलंगा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाकडून अनेकांनी उमेदवारी दाखल केली होती.यामुळे बंडखोरी होण्याची शक्यताही वर्तवली जात असतानाच पक्षश्रेष्ठींना ही बंडखोरी शमविण्यात मोठे यश आले.पण मनातुन असलेली नाराजी दुर करण्यासाठी निलंग्यात शुक्रवारी झालेल्या सभेत निलंगा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या कर्णधार पदांची सुत्रे अशोकराव पाटील निलंगेकर यांच्यावर सोपवुन अंतर्गत कलह संपल्याचे संकेत मतदारांसमोर दिले.
आपल्या खुमासदार भाषण शैलीत क्रिकेट खेळाची सांगड घालत आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा एक संघच जाहीर करताना काही जणांवर ही जबाबदारी सोपवली.संघामध्ये कर्णधार पदी अशोकराव पाटील निलंगेकर तर उपकर्णधार पदी डॉ शिवाजी काळगे, ओपनिंग फलंदाज उमेदवार अभय साळुंके, रनरअप डॉ अरविंद भातांब्रे, विकेट कि पर हमीद शेख ,जल्द गोलंदाज अजित माने ,फिरकी गोलंदाज म्हणून माजी खासदार सुधाकर शृगारे मानना संघात स्थान देत अमित देशमुख हे स्वतः वाॅटर मॅन चे काम पहाणार आहेत.या संघाचे कोच म्हणून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राहणार असल्याचे जाहीर होताच या संघाचे मतदारांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.
विधानसभेच्या कसोटी सामन्याच्या विजयानंतर संघाच्या नेतृत्वाचा मोठा सन्मान केला जाणार आहे.इच्छुक उमेदवारांनी नामांकन परत घेत मनाचा मोठेपणा दाखवला म्हणून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली असुन भविष्यात यांना मोठा मान सन्मान देण्याची घोषणा केल्याने काँग्रेस च्या विजयाचा मार्ग सुकर होणार आहे.

No comments