लातूरात 30 तोळे सोने लंपास
एकीकडे लातूर शहरात चोऱ्यांचे व खुनाचे प्रमाण वाढले आहे मात्र याकडे पोलिसांची नजर नाही तर पोलिसांची नजर गरीब पानटपरीधारकांवर ते काय विकत आहेत याच्यावर जर पोलिसांना खरेच जिल्ह्यात गुटखा व तत्सम पदार्थावर बंदी घालायची आहे व विक्री होऊ द्यायचे नाही तर आजुबाजूच्या राज्यातून येणाऱ्या गुटख्यावर व राज्यातंर्गत तयार होणाऱ्या गुटख्यावर जास्त लक्ष घातल्यास याचे चांगले परिणाम समोर येतील असे जनतेला वाटते
Latur Crime News : साखरपुड्याच्या कार्यक्रमातून 30 तोळे सोनं चोरीला (30 tolas of gold stolen) गेल्याची धक्कादायक घटना लातूर (Latur) शहरात घडली आहे. शहरातील एमआयडीसी (MIDC) भागात असणाऱ्या मंगल कार्यालयात ही घटना घडली आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सोन्याची चोरी करणारा चोर हा पाहुण्यासारखा आला आणि 30 तोळे सोने असलेली बॅग घेऊन गेला. मंगल कार्यालयात सर्वांच्या समोर ही चोरी झाली आहे.
घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद, पोलिसांचा तपास सुरु
साखरपुड्याचा कार्यक्रम संपल्यानंतर वधू आणि वर पक्षाकडे लोक थोडेसे निवांत झाले असताना त्या संधीचा फायदा घेत चोरट्याने 30 तोळ्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. स्टेजच्या बाजूला 30 तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग ठेवण्यात आली होती. चोरट्याने आरामात ही बॅग उचलली आणि मंगल कार्यालयाबाहेर निघून गेला. बॅग घेऊन जाणारा चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तो चोर पाहुणा असल्यासारखा आला आणि बॅग घेऊन आरामात निघून गेला. हा सगळा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
अलिकडच्या काळात राज्यात चोरीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ
अलिकडच्या काळात राज्यात चोरीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भरदिवसा चोरटे चोरी करुन जात असल्याचे प्रकार घडत आहेत. कोणत्या ना कोणत्या बहाण्याने येऊन चोर चोरी करत असल्याच्या अनेक घटना समोर देखील आल्या आहेत. अशीच काही घटना लातूर शहरात देखील घटडली आहे. साखपुड्याच्या कार्यक्रमात चोर पाहुण्यासारखा आला आणि 30 तोळं सोन असलेली बॅग अलगद घेऊन गेला. दरम्यान, कार्यक्रमाला भरपूर लोक असल्यामुळं लवकर हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला आहे. अनेकांना कोणतरी पाहुणा असल्याचा समज झाला असेल. ,ाच समजातून चोर चोरुन करुन पसार झाला आहे. मात्र, हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.