ईव्हीएम हॅक करण्याचा दावा करणाऱ्यावर एफआयआर

 




ईव्हीएम हॅक करण्याचा दावा करणाऱ्यावर एफआयआर


मुंबई : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) हॅक केल्याचा दावा करणाऱ्या सय्यद शुजाविरोधात निवडणूक आयोगाने एफआयआर दाखल केला आहे. ३० नोव्हेंबर रोजी दक्षिण मुंबईतील सायबर पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सय्यद शुजाचा १४ नोव्हेंबरला एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये तो महाराष्ट्र निवडणुकीत वापरण्यात येणारे ईव्हीएम हॅक करू शकतो, असा दावा करत होता. तसेच ५३ कोटी रुपये दिले तर ६३ जागांचे ईव्हीएम हॅक करू, अशी ऑफरही त्याने नेत्यांना दिली होती. माझ्याकडे महाराष्ट्रातील २८८ पैकी २८१ जागांवरील ईव्हीएमचे अॅक्सेस असल्याचे शुजाने म्हटले होते.

महाराष्ट्रातील निवडणुकी दरम्यान सय्यद शुजा याने निवडणूक जिंकण्यासाठी काही नेत्यांशी संपर्क साधला होता. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून तो ईव्हीएम हॅक करू शकतो, असा दावा त्याने केला होता. तो अमेरिकेच्या संरक्षण खात्यात कंत्राटावर काम करत असल्याचेही शुजाने सांगितले होते.

२०१९ मध्येही एफआयआर दाखल

सय्यद शुजा याने २१ जानेवारी २०१९ रोजी लंडनमध्ये ‘इंडियन जर्नालिस्ट असोसिएशन’च्या पत्रकार परिषदेतही असाच दावा केला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन बनवणाऱ्या टीमचा तो एक भाग होता. एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीचा वापर करून या मशिन्समध्ये छेडछाड केली जाऊ शकते, असे त्याने सांगितले होते.

Post a Comment

Previous Post Next Post