राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेस प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जिल्हा शाखा लातूर आणि दयानंद कला महाविद्यालय ( नाट्यशास्त्र विभाग ) लातूरच्या वतीने लातुरात आयोजित करण्यात आलेल्या नटवर्य श्रीराम गोजमगुंडे स्मृती करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी लातूरच्या नाट्य रसिक प्रेक्षकांनी एकांकिकांना आपली उपस्थिती नोंदवून कलाकारांच्या अभिनयाला दाद दिली.
सोमवारी या स्पर्धेत लक्ष्मीमामा फाऊंडेशन, लातूरचे आंबेडकरीझम, दयानंद कला महाविद्यालय, लातूरचे कॅलिडोस्कोप, श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शीचे राम मोहंमदसिंगआझाद, नाट्यमय, पुणे - हवेलीचे डोन्ट क्वीट , नाट्यआरंभ हवेली, पुणेचे शोषित , आर.आय.टी. इस्मालपूर, सांगलीचे व्हाय नॉट ?, मानवता बहुउद्देशीय संस्था, लातूरचे घुंगरू, श्री पंडितगुरू पार्डीकर महाविद्यालय, सिरसाळा चे सन्मानीय षंढांनो या एकांकिका सादर झाल्या. या एकांकिकातील सामाजिक आषयाने उपस्थित नाट्य रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. लातूरच्या नाट्य रसिकांचा या एकांकिका स्पर्धेस अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.
या एकांकिका स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्पर्धेचे निमंत्रक विक्रांत गोजमगुंडे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे लातूर जिल्हा अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर ( बाबा ), प्रमुख कार्यवाह धनंजय बेंबडे, उपाध्यक्ष अजय गोजमगुंडे, निलेश सराफ,कोषाध्यक्ष अमोल नानजकर , संघटक उमाकांत हुरदुडे, अविष्कार गोजमगुंडे, अनिल कांबळे, कल्याण वाघमारे, डॉ.अशोक आरदवाड, बाळकृष्ण धायगुडे, प्रदीप भोकरे, संजय अयाचित, अपर्णा गोवंडे, सुरेखा मदने, डॉ. भाग्यश्री कुलकर्णी, डॉ. मुकुंद भिसे, श्रुतिकांत ठाकूर, दीपरत्न निलंगेकर, एड. राणीताई स्वामी, सुधन्वा पत्की आदी मान्यवर परिश्रम घेत आहेत.
Tags
लातूर