25 हजार स्क्वेअर फुटांवर 50 क्विंटल रांगोळीतून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा


 

25 हजार स्क्वेअर फुटांवर 50 क्विंटल रांगोळीतून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा


माजलगावात (जि. बीड) सुंदरराव सोळंके महाविद्यालयाच्या अॅथलेटिक ट्रॅकवर शिवजन्मोत्सव समितीचे प्रमुख बाळू ताकट यांनी रांगोळीतून २५ हजार स्क्वेअर फुटांवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली. त्यासाठी ३० तास लागले.

५० क्विंटल रांगोळी
प्रतिमा साकारण्यासाठी असे रंग वापरण्यात आले आहेत.
10 क्विं. काळा । 09 क्विं. निळा
09 क्विं. पांढरा । 06 क्विं. केशरी
11 क्विं. लाल । 04 क्विं. पिवळा
10 क्विं. जांभळा । 07 क्विं. हिरवा

आठ कलाकारांनी साकारली रांगोळी
परभणी येथील कैलास राखोंडे, मारुती भैरट, वैष्णवी पांचाळ, अंबिका गायकवाड , मिथुन आडे, केशव वरणे, अनुष्का चांदेल, गणेश शेजूळ या आठ कलाकारांनी दिवस-रात्र सलग ३० तासांत ही प्रतिमा रांगोळीद्वारे साकारली. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला सायंकाळी पाच वाजता शिवप्रेमींसाठी ती खुली करण्यात आली.

आज सर्वधर्मीय २१ सामूहिक विवाह : आज माजलगावात २१ वधू-वरांचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा होत आहे. शिवाय भव्य मिरवणूक काढण्यात येईल.

Post a Comment

Previous Post Next Post