शिवज्योत आणायला गेले, मोटारसायकल्स एकमेकांवर आदळल्या

 

शिवज्योत आणायला गेले, मोटारसायकल्स एकमेकांवर आदळल्या




कोल्हापूर: संपूर्ण राज्यात आज मोठ्या उत्साहात शिवजयंतीचा उत्सव साजरा होता आहे. कोरोनाच्या खंडानंतर पहिल्यांदाच निर्बंधमुक्त शिवजयंती साजरी होत असल्याने शिवप्रेमींमध्ये उत्साह संचारला आहे. त्यामुळे राज्यभरात शिवजन्माचा सोहळा जल्लोषात साजरा केला जात आहे. मात्र, या आनंदावर विरजण घालणारी एक घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावर शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोन शिवप्रेमी तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील रजपूतवाडी येथे हा अपघात झाला. बाईक्सची धडक इतकी जोरदार होती की, संतोष पाटील आणि अक्षय पाडळकर या तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तरी उर्वरित तीन जणांवर सध्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे शिवप्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.





Post a Comment

Previous Post Next Post