चाकूरकर यांच्या भावाची देवघर येथे स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या - latursaptrangnews

Breaking

Sunday, March 5, 2023

चाकूरकर यांच्या भावाची देवघर येथे स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या







 चाकूरकर यांच्या भावाची देवघर येथे स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

चंद्रशेखर पाटील चाकूरकर वय 81 हे लातूर शहरातील आदर्श कॉलनी भागात राहत होते..ते शिवराज पाटील चाकूरकर यांचे चुलत भाऊ आहेत ..दररोज ते सकाळी फिरायला बाहेर जात असत.. त्यानंतर ते स्वताच्या घरी जाण्याऐवजी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरी येत ..चहा पाणी झाल्यावर तेथील पेपर वाचत बसणे ही त्याची खूप वर्षापासूनची सवय आहे .. त्यानंतर बाजूलाच असलेल्या स्वताच्या घरी ते जात असत .. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या कुटुंबातील अधिकतर व्यक्ती हे लातूर येथील निवासस्थानी कधीतरीच हजर असतात..आज शिवराज पाटील चाकूरकर यांचे चिरंजीव शैलेश पाटील हे सकाळी घरातच होते .. नित्याप्रमाने चंद्रशेखर पाटील चाकूरकर हे घरात आल्यावर त्यांना चहा घ्या मी आवरून येतो असे सागून ते निघून गेले ..काहीवेळाने गोळीचा आवाज झाला .. घरातील नोकर आणि शैलेश पाटील हे धावत हॉल मध्ये आले .. त्यांना तेथे चंद्रशेखर पाटील चाकूरकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले .. घटनेची माहिती तात्काळ लातूर पोलिसांना देण्यात आली आहे.. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा ची प्रक्रिया सुरू केली आहे ..
चंद्रशेखर पाटील चाकूरकर हे वडिलोपार्जित शेती वाडी पहात होते..त्यांना दोन मुले दोन मुली आहेत..सगळ्याची लग्ने झाली आहेत .. ते सद्या एका मुलाबरोबर चाकूरकर यांच्या घराच्या बाजूला असलेल्या फ्लॅट मध्ये राहत होते ..वयोमान प्रमाणे त्यांना अनेक शारीरिक व्याधी होत्या ..ते सततच्या आजारपणाला कंटाळून गेले होते ..घरात सून मुलगा आणि नातवंडे असल्यामुळे त्यांनी एकांत जाग म्हणून चाकूरकर यांच्या घरातील हॉल मध्ये आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे ..
चंद्रशेखर पाटील चाकूरकर याचे चिरंजीव ॲड लिंगराज पाटील यांनी दिलेल्या माहिती नुसार चंद्रशेखर पाटील चाकूरकर यांची बायपास झालेली होती ..अश्यातच अनेक व्याधी जडल्या होत्या सततच्या आजारपणाला ते कलंतळून गेले होते .. त्यातून हे कृत्य केले असावे ..अनेकांना केले होते मेसेज “गूड बाय” आज सकाळी ते दररोज प्रमाणे घरातून बाहेर पडले त्यानतंर त्यांनी स्वताच्या मोबाईल मधील परिचित असलेल्या अनेकांना टेक्स्ट मेसेज केला गूड बाय .. काहीवेळाने व्हॉट्सअँप स्टेटस ही ठेवला तो ही गूड बाय असा .. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या परवानाधारक पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली आहे




No comments:

Post a Comment