Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    अवैध मुरूम वाहतुकीच्या टिप्परने धडक दिल्याने पत्रकार संजय कंधारकर यांचा मृत्यू

     अवैध मुरूम वाहतुकीच्या टिप्परने धडक दिल्याने पत्रकार संजय कंधारकर यांचा मृत्यू 





    मुंबई : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्यावर गाडी घालून त्यांची हत्त्या केल्याची  घटना ताजी असतानाच तशीच घटना नांदेड जिल्ह्यात घडल्याचे समोर आले आहे.. .. 

    कंधार येथील पत्रकार संजय कंधारकर यांचा ही अवैध मुरूम वाहतूक करणारया डंम्परने धडक दिल्याने काल मृत्यू झाला आहे.. हा खरंच अपघात आहे की घातपात याची चौकशी करण्याची मागणी मराठी पत्रकार परिषद तसेच नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाने केली आहे... 


    कंधारकर हे लोहा येथून  कंधारकडे कामासाठी जात असताना कॅनल जवळ अवैध मुरूम घेऊन भरधाव वेगाने जाणारया टिप्परने संजय कंधारकर यांच्या दुचाकीस धडक दिल्याने ते जागेवरच खाली पडले.. कंधारकर जखमी अवस्थेत तासभर तसेच पडून होते.. मात्र त्यांना मदत मिळाली नाही. याचवेळी घटनास्थळापासून जाणारया एका डॉक्टराने  त्यांचा आणि  पत्रकार ओळखपत्रचा फोटो काढून तो व्हायरल केला.. यावरून यांची ओळख  पटली.. नंतर त्यांना शासकीय रुग्णालय नांदेड येथे  उपचारासाठी नेण्यात आले..  उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.. 

    उद्या सकाळी त्यांच्यावर गोवर्धन घाट येथे  अंतिम संस्कार करण्यात आले..

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad