केज येथे हल्लाविरोधी समितीची बैठक संपन्न याच धर्तीवर महाराष्ट्रभर बैठकांचे आयोजन होईल - एस एम देशमुख





 केज येथे हल्लाविरोधी समितीची  बैठक संपन्न 


याच धर्तीवर महाराष्ट्रभर  बैठकांचे आयोजन होईल - एस एम देशमुख 

============================



केज ! प्रतिनिधी :-



 हल्ला विरोधी कृतीसमितीच्या स्थापनेपासून जिल्हास्तरावर समितीची अशी बैठक झाली नाही केजला झालेल्या या बैठकीचे लोन आता राज्यभर पसरेल असा विश्वास मराठी पत्रकार समितीचे विश्वस्त एस एम देशमुख यांनी व्यक्त करत जिल्हा कृतीसमितीचे कौतुक केले                                    महिनाभरापूर्वी हल्लाविरोधी कृतीसमितीच्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यात निमंत्रक व समन्वयकाच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीची व कामाची माहिती व्हावी यासाठी जिल्हा निमंत्रक दत्ता अंबेकर व जिल्हासमन्वयक अभिमन्यू घरत यांच्या संकल्पनेतून केज येथील हॉटेल समर्थ याठिकाणी जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते  बैठकीच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके हे होते तर डिजिटल मीडियाप्रमुख अनिल वाघमारे , दत्ता अंबेकर , अभिमन्यू घरत , मंगेश निटूरकर , रवी उबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती 

                पुढे बोलताना देशमुख म्हणाले कि  पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ल्याच्या घटनात भर पडत आहे आठ दिवसापूर्वी मुक्तपत्रकार तथा शिक्षणतज्ञ् हेरंब कुलकर्णी  यांच्यावर काहींनी हल्ला केला तरी पोलिसप्रशासन अनेक तास काहीच करत नाही हि बाब खेदजनक आहे अशा व यापूर्वीच्या घटनांमधून आपण शिकणे गरजेचे आहे आपले मजबूत संघटन काळाची गरज आहे पत्रकार संरक्षण कायदा होण्यासाठी किती संघर्ष करावा लागला याचा पाढा त्यांनी यावेळी वाचत केजमध्ये होणारी बैठक महत्वपूर्ण असल्याचा उल्लेख केला व हल्ला विरोधी समितीची जिल्हास्तरावर होणारी हि राज्यातील पहिली बैठक आयोजित केल्याबद्दल केजचे निमंत्रक सुहास चिद्रवार व समन्वयक दशरथ चवरे यांचे अभिनंदन करत या बैठकीच्या धर्तीवर आता कृतीसमितीच्या बैठका राज्यभर सुरु होतील असा आशावाद देखील व्यक्त केला  त्यांनी हल्ल्याच्या परिस्थितीत कशा पद्धतीने काम करावे याचे मार्गदर्शन देखील केले  यावेळी दत्ता अंबेकर , विशाल साळुंके , अनिल वाघमारे यांची समयोचित भाषणे देखील झाली तर जिल्ह्यातून आलेल्या परळी निमंत्रक आत्मलिंग शेटे व अंबाजोगाई येथील निमंत्रक जाधव यांनी आपली मनोगते व्यक्त केली

         बैठकीचे सुत्रसंचलन हनुमंत भोसले यांनी केले तर आभारप्रदर्शन गौतम बचुटे यांनी केले बैठकीच्या यशस्वीतेसाठी डिजिटल मीडिया केजचे अध्यक्ष रामदास तपसे , परिषदेचे तालुकाध्यक्ष विजय अरकडे , धनंजय देशमुख ,  रमेश गुळभिले , अशोक सोनवणे , धनंजय कुलकर्णी , सतिष केजकर , नंदकुमार मोरे , अनिल गलांडे , अजय भांगे , प्रकाश मुंडे , दत्ता हंडीबाग , धनंजय घोळवे , बाळासाहेब जाधव महादेव काळे , मुबशीर खतीब , सन्नी शेख , यांनी विशेष प्रयत्न केले 



1)

 पत्रकार , राजकीय व्यक्ती व सामाजिक कार्यकर्ते यांच्यात निकोप संबंध असावेत त्यांच्यात संवाद असावा यासाठी त्यांचे एकत्रित स्नेहभोजन  ठेवण्यात येऊन स्नेहभोजनादरम्यान विविध विषयांवर दिलखुलास चर्चा करण्यात आली


Post a Comment

Previous Post Next Post