बाईकवरुन जंगलात जाणाऱ्याला पोलिसांनी रोखलं; ४७ लाख सापडले - latursaptrangnews

Breaking

Tuesday, October 24, 2023

बाईकवरुन जंगलात जाणाऱ्याला पोलिसांनी रोखलं; ४७ लाख सापडले

 

बाईकवरुन जंगलात जाणाऱ्याला पोलिसांनी रोखलं; ४७ लाख सापडले



भोपाळ: मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये ४७ लाख रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. सुलतान करोसिया असं आरोपीचं नाव आहे. नोटबंदी दरम्यान नोटा कचऱ्यात सापडल्या होत्या. इतकी वर्षे त्या लपवून ठेवल्या होत्या, असा दावा त्यानं केला. पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे.

जुन्या नोटा नव्या चलनात बदलण्यासाठी सुलतान करोसिया जंगलात एका मांत्रिकाकडे जात होता. 'वशीकरणाच्या माध्यमातून आपण जिन्नकडून हवी ती कामं करुन घेत असल्याचा दावा एका मांत्रिकानं फोन कॉलवर केला होता. आपण जुन्या नोटांचं रुपांतर नव्या नोटांमध्ये करू शकतो, असा दावादेखील त्यानं केला. त्यामुळे जंगलात मांत्रिकाकडे जात होतो,' अशी माहिती आरोपीनं पोलिसांना दिली.

'गोपनीय सुचनेच्या आधारे मुरेना रोडवर एका दुचाकीस्वाराला रोखण्यात आलं. त्यानं पळण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्याला रोखण्यात यशस्वी ठरलो. त्याच्याकडे असलेल्या झडती घेण्यात आली. तेव्हा त्यात ४७ लाख रुपये सापडले. बॅगमध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा होत्या,' असा तपशील पोलीस अधीक्षक राजेश सिंह चंदेल यांनी दिली. आरोपीला समाधानकारक स्पष्टीकरण देता आलं नाही. घटनेची माहिती प्राप्तिकर विभागाला देण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे, असं चंदेल यांनी सांगितलं.


No comments:

Post a Comment