Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    गरबा खेळताना भोवळ येऊन पडला, ऐन नवरात्रात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

     


    गरबा खेळताना भोवळ येऊन पडला, ऐन नवरात्रात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

    नाशिक : मध्यरात्री बारा वाजेपर्यंत गरब्याची परवानगी असताना रविवारी (दि. २२ ऑक्टोबर) रोजी उशिरापर्यंत गरबा खेळत असताना भोवळ येऊन पडलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रवींद्र अशोक खरे (वय ३६, रा. त्रिमूर्ती चौक) असे या तरुणाचे नाव आहे.

    हा तरुण महात्मानगर परिसरातील संत कबीरनगरात गरबा खेळत असताना हा प्रकार घडला होता. या प्रकरणी गंगापूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

    नवरात्रोत्सवाच्या अखेरीस शहरात सांस्कृतिक कार्यक्रमात तरुणाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. रवींद्र खरे रात्री गरबा खेळण्यासाठी संत कबीरनगर परिसरात आला होता. साडे अकरा वाजताच्या सुमारास भोवळ आल्याने तो कोसळला.

    त्याला त्वरित खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पहाटे अडीच वाजता त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad