Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखाना येथे बाॅयलर अग्नी प्रदीपन व गळीत हंगामाचा शुभारंभ संपन्न चालू गळीत हंगाम यशस्वी करून परंपरा कायम ठेवणार- सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख

     विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखाना येथे बाॅयलर अग्नी प्रदीपन व गळीत हंगामाचा शुभारंभ संपन्न चालू गळीत हंगाम यशस्वी करून परंपरा कायम ठेवणार- सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख


    विलास नगर:--
     विकासरत्न  विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा ३७वा गळीत हंगाम २०२३- २४ साठीचा बाॅयलर अग्नी प्रदीपन व गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ माजी मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब, माजी मंत्री तथा कारखाना संचालक आ. अमित विलासरावजी देशमुख साहेब,लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासरावजी देशमुख साहेब यांच्या हस्ते विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर  संपन्न झाला.

    यावेळी माजी आमदार त्र्यंबक भिसे,राज्य साखर संघाचे संचालक आबासाहेब पाटील, जिल्हा बँकचे माजी चेअरमन श्रीपतराव काकडे, रेणाचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, मांजराचे व्हा चेअरमन श्रीशैल उटगे,लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, जिल्हा बँकेचे व्हा चेअरमन प्रमोद जाधव,२१ शुगरचे व्हा. चेअरमन विजय देशमुख,विलास कारखान्याचे व्हा.चेअरमन रविंद्र काळे,
    संतशिरोमणी कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजूळगे, व्हा.चेअरमन शाम भोसले,मांजराचे सर्व संचालक तसेच राजकुमार पाटील,सचिन सुर्यवंशी, संभाजी रेड्डी,संभाजी सुळ, चांदपाशा इनामदार, सुपर्ण जगताप,कार्यकारी संचालक पंडित देसाई,विलास कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई
    याची उपस्थिती होती.

    यावेळी मनोगत व्यक्त करत असताना सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब म्हणाले की, मांजरा कारखान्याने दैनंदिन गाळप क्षमता विस्तार केल्याने शेतक-यांचा ऊस तत्परतेने  गाळप होण्यासाठी मदत होणार आहे. साखरे सोबतच उपपदार्थ निर्मितीतून शेतकऱ्यांना अधिकचा दर देण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

     याप्रसंगी बाॅयलर अग्नी प्रदीपनासाठी कारखान्याचे संचालक वसंतराव ऊफाडे यांच्या हस्ते सपत्नीक पुजन झाले तसेच गळीत हंगामासाठी संचालक नवनाथराव काळे यांच्या हस्ते सपत्नीक विधीवत पुजन संपन्न झाले.यावेळी शेतकरी सभासद, कारखाना खाते प्रमुख, अधिकारी,कर्मचारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.





    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad