संभाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थी संसदेच्या उद्घाटन संपन्न - latursaptrangnews

Breaking

Wednesday, October 25, 2023

संभाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थी संसदेच्या उद्घाटन संपन्न



 संभाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थी संसदेच्या उद्घाटन संपन्न


प्रत्येक महाविद्यालयातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा सर्वांग विकास होत असतो :-डॉ. जगदीश देशमुख 



"संभाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थी संसद सचिव पदी कु. श्रद्धा शिंदे यांची निवड"


मुरुड प्रतिनिधी( श्रीकांत टिळक):- राज्याचे राजकीय नेतृत्व महाविद्यालयातील विद्यार्थी संसदेमधून संसदेमधून निर्माण होते. असे मत डॉ. जगदीश देशमुख व्यक्त केले,प्रत्येक महाविद्यालयातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा सर्वांग विकास होत असतो.

 तसेच संभाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थी संसदेच्या उद्घाटन. त्याकरिता महाविद्यालयात वेळोवेळी वेगवेगळे कार्यक्रम राबवले जतात .त्याचाच एक भाग म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थी संसद  व या विद्यार्थी संसदेतून राजकीय नेतृत्वाचा विकास होतो असे प्रतिपादन डॉ.जगदीश देशमुख यांनी केले ते संभाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थी संसदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते  पुढे ते म्हणाले की भारत हा तरुणांचा देश आहे व आजचे तरुण हे उद्याच्या देशाचे आधारस्तंभ आहेत, या महाविद्यालयात मुलींची संख्या जास्त आहे आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर असल्याचे दिसून येते त्यामुळे विद्यार्थिनी महाविद्यालयातील कालावधीत स्वतःचा सर्वांग विकास करून घेतला पाहिजे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक मधुकर क्षीरसागर यांनी केले त्यावेळी त्यांनी विद्यार्थी संसदेची रचना व संसदीय कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला संभाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थी संसद सचिव पदी कु. श्रद्धा शिंदे यांची निवड करण्यात आली यावेळी सर्व विद्यार्थी संसद सदस्यांचे स्वागत करण्यात आले सदरील कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना समाज जागृती शिक्षण संस्थेचे सचिव विजय पाटील म्हणाले की विद्यार्थी संसदेतील सर्व वर्ग प्रतिनिधी वर्गाचे प्रतिनिधित्व करत असतात त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या प्राचार्याकडे मांडून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मीना कदम यांनी केले तर आभार प्रा महादेव गायकवाड यांनी मांडले या कार्यक्रमास प्राचार्य आनंद पिडगे प्रभारी प्राध्यापक डॉ. संदेश उबाळे समिती सदस्य डॉ.पद्माकर देशमुख  प्रा.मधुकर क्षीरसागर प्रा कु. दीक्षित मॅडम व मोठ्या संख्येने विद्यार्थी व प्राध्यापक आणि कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment