Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    नाशिकच्या गिरणा नदीत सापडले कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स; मध्यरात्रीपासून शोधमोहीम सुरू

     


     नाशिकच्या गिरणा नदीत सापडले कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स; मध्यरात्रीपासून शोधमोहीम सुरू


    nashik lalit patil drugs racket : ललित पाटील ड्रग्स रॅकेट प्रकरणी मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये मोठी कारवाई केली असून नाशिकच्या गिरणा नदीतून कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्सने भरलेल्या गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत.

    Drug Case: ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणी अनेक धक्कादायक माहिती पुढे येत आहे. मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री नाशिकमध्ये मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहे. मध्यरात्री अडीच वाजता देवळा तालुक्यातील ठेंगोडा गावाजवळील गिरणा नदीपात्रात शोध मोहीम सुरू करण्यात आली असून या ठिकाणी ड्रग्सने भरलेल्या गोण्या पोलिसांनी जप्त केल्या आहे. नदीत शोध मोहीम सुरू असून या साठी पोलिसांनी रायगडमधील प्रशिक्षित स्कुबा डायव्हिंगचे पथकाची मदत घेतल्या जात आहे.

    ड्रग्ज माफिया ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे. सोमवारी मध्यरात्री देवळा तालुक्यातील ठेंगोडा येथे ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांना गिरणा नदी पात्रात ड्रग्सने भरलेल्या गोण्या फेकल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नदी पात्रात मंगळवारी मध्यरात्री पासून शोधमोहीम राबवली जात आहे. आता पर्यन्त अनेक गोण्या या नदीपत्रातून काढण्यात आल्या आहेत. ललित पाटीलचा ड्रायव्हर सचिन वाघच्या चौकशीतून या ड्रग्सच्या साठयाबाबात माहिती मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.


    ललित पाटीलचा साथीदार सचिन वाघ याने नाशिकच्या कारखानामध्ये बनविलेले ड्रग्ज नष्ट करण्यासाठी हे ड्रग्स गिरणा नदीपात्रात फेकून दिले. दरम्यान, सचिन वाघ पोलिसांच्या हाती लागण्यावर त्याची चौकशी करण्यात आली. यानंतर ही कारवाई करण्यात आली. मंगळवारी मध्यरात्री २.३० च्या सुमारास मुंबई पोलिसांचे पथक गिरणा नदीपात्राजवळ पोहचले. पोलिसांनी रायगडमधील प्रशिक्षित स्कुबा डायव्हिंगचे पथकाच्या मदतीने मध्यरात्रीपासून नदीपात्रातून ५० किलोच्या दोन गोण्या भरून असलेले ड्रग्ज नदी पात्रात बाहेर काढले. नदीपत्रात अजूनही शोध मोहीम सुरू आहे.

    मुंबई पोलिसांनी ललित पाटील याला अटक केली असून त्याला २७ तारखेपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. ललित पाटीलला ससून रुग्णालयातून पळून जाण्यासाठी साथीदार ड्रायव्हर सचिन वाघ याला देखील अटक करण्यात आली असून वाघ याच्या साह्याने त्याने ड्रग्सची विल्हेवाट लावली होती.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad