Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    Maratha Protest : बीडमध्ये मराठा आंदोलनाचा वणवा भडकला.. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्यासह राष्ट्रवादी भवन पेटवलं


     

    Maratha Protest : बीडमध्ये मराठा आंदोलनाचा वणवा भडकला.. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्यासह राष्ट्रवादी भवन पेटवलं


    Beed Maratha Reservation Protest : बीडमध्ये मराठा आंदोलनाचा उद्रेक झाला असून आमदार प्रकाश सोळंके यांचे घर, माजलगाव नगरपरिषदेला आग लावल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रवादी आमदार संदीप क्षीरसागर व बीडमधील राष्ट्रवादी कार्यालयाला आग लावली आहे.

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषण करत असून त्यांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती ढासळली असून सरकारने आरक्षणासाठी आणखी वेळ मागितला आहे. दुसरीकडे मराठा समाजाच्या संयमाचा बांध सुटल्याचे दिसत असून बीडमध्ये मराठा आंदोलनाचा उद्रेक झाला आहे. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक करून पार्किंगमधील वाहनांना आग लावण्यानंतर आंदोलकांनी माजलगाव नगर परिषदेची इमारत पेटवली होती.


    त्यानंतर आता बीडमधील राष्ट्रवादीचे आमदर संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय 'राष्ट्रवादी भवन' पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. बीडमध्ये संतप्त जमावाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (MLA Sandeep Kshirsagar) आणि ओबीसीचे ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर हे राहत असलेल्या बंगल्याला आग लावली आहे.

    बीडमध्ये सुरू असलेल्या' या' जाळपोळीच्या घटनांमुळे बीडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याआधी मराठा आंदोलकांच्या जमावाने क्षीरसागर कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या केएसके कॉलेजच्या संस्था कार्यालयाला आग लावली होती.

    मराठा आंदोलकांनी राजकीय पक्षांशी संबंधित हॉटेल, संस्थांच्या कार्यलयाची जाळपोळ, नासधूस केल्याच्या झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.बीडमधील मुख्य बाजारपेठेत जमावाने दगडफेक केल्यानंतर बीड शहरातील सगळी बाजारपेठ बंद करण्यात आली. जमावाने रस्त्यावर लावलेल्या दोन मोटरसायकली पेटवल्या.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad