Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    अल्पसंख्याक समाजासाठी मिनी हज हाऊस नाशिक शहरात बांधण्याची मांगणी.





     अल्पसंख्याक समाजासाठी मिनी हज हाऊस नाशिक शहरात बांधण्याची मांगणी.


    नाशिक जिल्हा अल्पसंख्याक कल्याण समिती सदस्य रफिक शेख यांचे कडुन पालकमंत्री दादा भुसेनां निवेदन.


    नाशिक प्रतिनिधि : माजिद खान 


    उत्तर महाराष्ट्रात अल्पसंख्याक मोठ्या प्रमाणात असुन आजपावेतो अल्पसंख्याक समाजासाठी महाराष्ट्र शासने एकही ईमारत बांधुन दिलेली नाही. यामुळॆ अल्पसंख्याक समाज करीता तिन ईमारत नाशिक शहरात बांधुन देण्यात यावे असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

    1) मिनी हज हाऊस बांधणे 

    2) ऊर्दू भवन बांधणे, 

    3) अल्पसंख्याक समाजाचे मुलां-मुलीकरीता होस्टल बांधुणे.

    अल्पसंख्याक समाजाला या ईमारतीचे निश्चित लाभ होणार आहे.

    तसेच अल्पसंख्याक समाज वर्षातुन एकदा हज यात्रेला जात असतात. त्याकरीता ऊत्तर महाराष्ट्रचे मुस्लिम समाजला मिनी हज हाऊसचा वापर करण्यात मदत होईल,

    नाशिक शहराला लागुन असलेले जिल्ह्यातील अल्पसंख्याकांना  नाशिक शहर मध्यवर्ती (सेंटर) असल्यामुळे मिनी हज हाऊस, ऊर्दु घर व होस्टलचे ईमारत बांधल्याने अल्पसंख्याक समाजला फायदा होणार असल्यामुळे लवकरात लवकर तिनही ईमारती बांधकाम करुन देण्यात यावे असे निवेदन नाशिक जिल्हा अल्पसंख्याक कल्याण समिती सदस्य रफिक शेख यांचे कडुन देण्यात आले. सोबत आदिल बंडु शेख,  फिरोज नवाब शेख,  हानिफ ताहेर शेख, नाजिम शेख,  उबेद खान, उपस्थित होते.


    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad