Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    Pune maratha protest: नवले पुलावरील जाळपोळ प्रकरणी पुण्यात ४०० ते ५०० मराठा आंदोलकांवर गुन्हे

     


    Pune maratha protest: नवले पुलावरील जाळपोळ प्रकरणी पुण्यात ४०० ते ५०० मराठा आंदोलकांवर गुन्हे


    पुणे : पुण्यात मराठा आरक्षणासाठी मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ मंगळवारी हिंसक आंदोलन करण्यात आले होते. हा मार्ग आंदोलकांनी रोखून धरला होता. या प्रकरणी सिंहगड पोलिसांनी तब्बल ५०० आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहे.

    रवी पडवळ, प्रशांत पवार, निखिल पानसरे, योगेश दसवडकर, उमेश महाडिक, संतोष साठे, निखिल धुमाळ, समीर घाटे, अभिषेक भरम, विराज सोले यांच्यासह ४०० ते ५०० आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार नितीन खुटवड यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील विविध भागात आंदोलक आक्रमक झाले आहे. बीड, धाराशिव , हिंगोली, छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी आंदोनल हिंसक झाले आहे. या आंदोलनाचे लोण पुण्यात देखली पोहचले आहे. आज मंगळवारी विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. काही आंदोलकांनी नवले पूल येथे मुंबई बंगलोर महामार्ग रोखला होता.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad