लातूर जिल्ह्यातील दलित हत्याकांडाबाबत सीबीआय चौकशी करा चळवळीतील कार्यकर्ते ,पक्ष, संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - latursaptrangnews

Breaking

Monday, August 5, 2024

लातूर जिल्ह्यातील दलित हत्याकांडाबाबत सीबीआय चौकशी करा चळवळीतील कार्यकर्ते ,पक्ष, संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लातूर - लातूर शहर व जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून विविध ठिकाणी दलित युवक,विद्यार्थी यांना जातीय मानसिक द्वेषातून हत्या व अत्याचार करण्याचे प्रकार वाढले आहेत.
त्यामध्ये
1)लातूर शहरातील एमआयडीसी येथील विवेकानंद शैक्षणिक संकुल व राजमाता जिजाऊ वस्तीगृहात इयत्ता सातवी मध्ये शिकणाऱ्या बौद्ध समाजातील अरविंद राजाभाऊ खोपे विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू
2) (मयत) सायली सिद्धार्थ गायकवाड रा.नायगाव तालुका चाकूर जिल्हा लातूर, विवेकानंद चौक पो.स्टे.
3)(मयत) आकाश व्यंकट सातपुते रा.भुसणी तालुका औसा.औसा पो.स्टे.
4)(मयत) सचिन शिवाजी सूर्यवंशी देवणी.उदगीर पो.स्टे.
5) विनोद पंढरी कांबळे रा. शिरूर अनंतपाळ
6) बालाजी शेषेराव कांबळे रा.शिरूर अनंतपाळ. शिरूर अनंतपाळ पो.स्टे.
वरील प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करावी व तात्काळ दक्षता कमिटी नेमून सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करून फरार आरोपींना तात्काळ अटक करून न्याय देण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दलित समाजातील विविध संघटना पक्ष संस्था चळवळीतील कार्यकर्ते आली आहे.
 उद्यापासून गांधी चौक येथे तीन दिवसीय धरणे आंदोलन . 

No comments:

Post a Comment