महाराष्ट्रातील पहिला आमदार ठरला, एक लाखांच्या मताधिक्क्याकडे वाटचाल, विरोधकांचा सुफडा साफ
पुणे : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे कल आता समोर येत आहेत. महाराष्ट्रात २०१४ पेक्षा भाजपची मोठी लाट आल्याचं दिसत आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून आता जवळपास अर्ध्या जागांचे निकाल आता समोर आले आहेत. यामध्ये काही जागांवरील चित्र स्पष्ट झाले आहे. पुण्यातील मावळ विधानसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांचा विजय निश्चित झाला आहे. २९ फेऱ्यांपैकी २४ फेऱ्यांमधील मतमोजणीनुसार सुनील शेळके यांना ९५ हजारांपेक्षा अधिक लीड घेतले असून सुनील शेळके आता विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या कलांमध्ये सुनील शेळके यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाल्याचं दिसत आहे.
Tags
महाराष्ट्र