बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेता, मात्र त्यांच्या मुलाच्याच पाठीत खंजीर खुपसता
कोल्हापूर : 'कोल्हापूर ही स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या वीरांची भुमी आहे, या भूमीतील संतांनी समाजाला मानवतेचा आणि समानतेचा संदेश दिला. या भूमीवर आल्यावर गर्व वाटतो, देशातील काही मोठे नेते भाषण करताना ऐकले. या नेत्यांच्या भाषणात सकारात्मक आणि खरं बोलतील अशी अपेक्षा होती मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे निराश करणारी आहेत. महाराष्ट्रात नेत्यांकडून या भूमीचा अपमान होत आहे. छत्रपती शिवरायांचा ही अपमान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच नाव घेतात, मात्र त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसतात, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केली आहे.
गेल्या दहा वर्षांपासून आणि राज्यात गेल्या अडीच वर्षांपासून महायुती सरकार आहे, असे असताना इथल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केलं? असा सवाल करत सत्ताधारी काहीही करत नाहीत, निवडणूक आली की जातीधर्मामध्ये फूट पाडतात आणि मत घेतात, असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या आज विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी आज महाराष्ट्र दौऱ्यावर होत्या. दरम्यान दुपारी कोल्हापुरातील दहा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी आणि पुरस्कृत उमेदवारांच्या प्रचारार्थ गांधी मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेसाठी त्या उपस्थित राहिल्या. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही याच मैदानावर सभा घेतली होती. यानंतर आज पहिल्यांदाच प्रियंका गांधी कोल्हापुरात आल्या आणि याच मैदानावर सभा घेत असल्याने या सभेला कोल्हापूरकरांनी तुडुंब गर्दी केली होती. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या या सभेला राज्याचे माजी मंत्री विश्वजीत कदम, कुस्तीपटू बजरंग पुनिया, खासदार शाहू छत्रपती यांच्यासह जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे विधानसभा उमेदवार उपस्थित होते.
बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेता, मात्र त्यांच्या मुलाच्याच पाठीत खंजीर खुपसता
कोल्हापूर : 'कोल्हापूर ही स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या वीरांची भुमी आहे, या भूमीतील संतांनी समाजाला मानवतेचा आणि समानतेचा संदेश दिला. या भूमीवर आल्यावर गर्व वाटतो, देशातील काही मोठे नेते भाषण करताना ऐकले. या नेत्यांच्या भाषणात सकारात्मक आणि खरं बोलतील अशी अपेक्षा होती मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे निराश करणारी आहेत. महाराष्ट्रात नेत्यांकडून या भूमीचा अपमान होत आहे. छत्रपती शिवरायांचा ही अपमान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच नाव घेतात, मात्र त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसतात, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केली आहे.
गेल्या दहा वर्षांपासून आणि राज्यात गेल्या अडीच वर्षांपासून महायुती सरकार आहे, असे असताना इथल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केलं? असा सवाल करत सत्ताधारी काहीही करत नाहीत, निवडणूक आली की जातीधर्मामध्ये फूट पाडतात आणि मत घेतात, असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.

अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या आज विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी आज महाराष्ट्र दौऱ्यावर होत्या. दरम्यान दुपारी कोल्हापुरातील दहा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी आणि पुरस्कृत उमेदवारांच्या प्रचारार्थ गांधी मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेसाठी त्या उपस्थित राहिल्या. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही याच मैदानावर सभा घेतली होती. यानंतर आज पहिल्यांदाच प्रियंका गांधी कोल्हापुरात आल्या आणि याच मैदानावर सभा घेत असल्याने या सभेला कोल्हापूरकरांनी तुडुंब गर्दी केली होती. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या या सभेला राज्याचे माजी मंत्री विश्वजीत कदम, कुस्तीपटू बजरंग पुनिया, खासदार शाहू छत्रपती यांच्यासह जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे विधानसभा उमेदवार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment