सार्वजनिक अभ्यासिकेला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव द्या :- सकल सर्व समाजातील बांधव
मुरुड प्रतिनिधी :- मुरुड ग्रामपंचायत कार्यालय यांच्यामार्फत चालणाऱ्या येणाऱ्या अभ्यासिकेला क्रांती ज्योती प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्या संदर्भात मागणी केली आहे. सदरचे निवेदन मुरुड येथील सर्व समाजातील बांधवांनी व नागरिकांनी दिले आहे.
दिलेला निवेदनात असे म्हटले आहे की,भारतातील प्रथम शिक्षकाचा मान ज्यांना मिळतो त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्त्रियांसाठी शाळा काढून स्त्री शिक्षणाचा पाया रोवला अशा महान शिक्षक तज्ञ अध्यपिका यांची प्रेरणा आजच्या पिढीला मिळावी. या उद्देशाने ग्राम पंचायतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देऊन त्यांना सन्मानित करावे अशी मागणी केली आहे.
तसेच भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या.भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते.महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते सावित्रीबाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत.या दोघांनी १ जानेवारी, १८४८ रोजी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती.तत्पूर्वी अमेरिकन मिशनरी सिंथिया फरार यांनी १८२९ मध्ये मुंबईत मुलींची शाळा सुरू केली होती. १८४७ मध्ये, विद्यार्थी साहित्यिक आणि वैज्ञानिक समाजाने मुंबईच्या गिरगाव परिसरात मुलींसाठी कमलाबाई हायस्कूल सुरू केले. त्यामधील शिकणाऱ्या महिलांनी तेवढीच भूमिका निभावली होती. पेरी चरण सरकार यांनी १८४७ मध्ये बारा सात या बंगाली शहरात काली कृष्ण गर्ल्स हायस्कूल नावाची मुलींसाठी शाळा सुरू केली. पारशी समुदाय मुंबईने १८४७ मध्ये मुलींसाठी एक शाळा देखील स्थापन केली होती. अशा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याबाबत सकल मुरुड येथील सर्व समाजातील बांधवांनी असे ग्रामपंचायत कार्यालयातच्या अंतर्गत असणाऱ्या अभ्यासिकेला नाव देण्याचे निवेदन दिले आहे. ग्रामपंचायत या निवेदनावर काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष केंद्रित झाली आहे ? तरी या संदर्भात उचित निर्णय घ्यावा व प्रथम अध्यापिका, स्त्री शिक्षणाचे जनक,क्रांती ज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचे नाव द्यावे. नागरिकात अशीही सुलट- उलट ग्रामपंचायत कार्यालय हे सन्मान देतील का ? व तसेच की प्रलंबित ठेवतील हा एक चर्चेचा विषय बनला आहे. सदरच्या निवेदनावर 164 नागरिकांनी स्वाक्षरी केल्या आहेत. यावेळी गावातील नागरिक, मुरुड ग्रामपंचायत चे उपसरपंच हणमंत नागटिळक, ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब दुधाटे, माळी सर, सावता माळी, रमजान सय्यद , राजेंद्र नाडे, संभाजी कोळी आदी उपस्थित होते.