जनता विद्या मंदिर प्रशालेचा इयत्ता दहावीचा 97.73% निकाल

 





जनता विद्या मंदिर प्रशालेचा इयत्ता दहावीचा 97.73% निकाल

मुरुड :- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेमध्ये येथील जनता विद्या मंदिर प्रशालेचा 97.73 % निकाल लागला असून... प्रशालेचे तब्बल 77 विद्यार्थी 90% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.

 इयत्ता दहावी ला परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या एकूण 529 विद्यार्थ्यांपैकी 77 विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले आहेत.

 प्रशालेमधून  गुणानुक्रमे पहिले तीन विद्यार्थी खालील प्रमाणे...

1)कु.आदिती सचिन आदमीले-100%

2)चि.उदय किशोर सुरवसे-99.60%

3)कु.प्रगती धोंडीराम माळी-98.80%

 तसेच 149 विद्यार्थी विशेष प्राविण्‍यामध्ये,144 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये, 105 विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये,तर 42 विद्यार्थी तृतीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत.

 प्रशालेच्या या यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना शिकवणाऱ्या सर्व शिक्षकवृंदांचे रुरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री यशवंतरावजी नाडे पाटील, उपाध्यक्ष श्री हरिश्चंद्ररावजी माने, सचिव ऍड, श्री विजय पाटील,  कोषाध्यक्ष श्री बी.एस.पटाडे, सहसचिव श्री विवेक पांगळ व कार्यकारणी सदस्य सौ सुवर्णाताई पांगळ, श्री दिपक पटाडे, प्रशासकीय अधिकारी श्री अमरभय्या मोरे यांच्यासह प्रशालेचे मुख्याध्यापक श्री डी. व्ही. जाधव, ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री जी. पी. पिसाळ, श्री अरुण पाटील, श्रीमती तनुजा कोष्टी परीक्षा विभाग प्रमुख श्री येवतीवाड वाय.पी . व श्री कांबळे गजेंद्र यांनी अभिनंदन केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post