पत्रकार सत्तेच्या बाजूने नसतो सत्याच्या बाजूने असतो-डॉ.नागोराव कुंभार
यशप्राप्तीसाठी सातत्य गरजेचे-डॉ.विठ्ठल लहानेलातूर : समृध्द व्यापारच्या 11 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार सर तर उद्घाटक म्हणून डॉ.विठ्ठल लहाने हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डीवायएसपी गजानन भातलवंडे, सहाय्यक उपसंचालक डॉ.शाम टरके आणि प्र.जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप हे मान्यवर उपस्थितीत होते.
व्यासपीठावरून बोलताना डॉ.कुंभार म्हणाले, पत्रकार सत्तेच्या बाजूने नसतो सत्याच्या बाजूने असतो. लातूरची पत्रकारिता ही पॉझिटिव्ह आहे. डॉ.लहाने म्हणाले कोणत्याही यशासाठी सातत्य गरजेचे असते. डीवायएसपी भातलवंडे म्हणाले, मरेपर्यंत देशसेवा करणार तर डॉ.टरके म्हणाले डिजिटल पत्रकारिता करणे आवश्यक आहे. माहिती अधिकारी तानाजी घोलप यांच्यासह सर्व मान्यवरांनी समृध्द व्यापाराला शुभेच्छा दिल्या. वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांना शाल, तुळशीचे रोप, समृध्द व्यापारचा राज्यस्तरीय दिवाळी विशेषांक, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी का. संपादक निशांत परळकर, चंद्रकला परळकर, मोहिनी परळकर, गोरक्षनाथ मरळकर, शैलेश मरळकर, श्लोक कुंभार, राघवेंद्र देबडवार, रविकिरण सूर्यवंशी, माधव तरगुडे, वीरभद्र तरगुडे, संतोष सोनवणे, विष्णू कळसे आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समृध्द व्यापारचे संपादक दत्तात्रय जी. परळकर यांनी केले. सूत्रसंचालन सूरज मांदळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.दत्ता रामरुले यांनी केले.
पुरस्कार प्राप्त व्यक्ती ः बाळासाहेब मोहिते-समृध्द अर्थ भूषण, संजय राजुळे-समृध्द आरोग्य भूषण, इस्माईल शेख-समृध्द मुख्याध्यापक भूषण, गंगाधर डिगोळे-समृध्द पत्रकार भूषण, स्वाती योगानंद जोशी समृध्द रणरागिणी भूषण, उषा आडे-समृध्द समाज भूषण
Tags
लातूर