लातूरमध्ये महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश अध्यक्ष श्री सयाजी झुंजार यांचा भव्य सत्कार
दिनांक १५.५.२०२५ रोजी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश अध्यक्ष श्री सयाजी झुंजार व प्रदेश कोषाध्यक्ष श्री रामदासजी पवार यांचा लातूर येथे श्री सिद्धाजी गवळी परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला. या विशेष सत्कार समारंभात नाभिक समाजाच्या एकतेचा व विकासाचा संदेश देण्यात आला.
या सोहळ्याला महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष श्री मनोज शेंद्रे, श्री सचिन राऊत, श्री श्रीराम गवळी, श्री आदित्य गवळी, इंजि. हाडोळे साहेब तसेच श्री अभिजित शिंदे,श्री रोहित धकतोडे व इतर मान्यवर आणि नाभिक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्काराच्या निमित्ताने समाजाच्या प्रगतीसाठी चालू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. समाजातील एकजूट, संघटनबळ आणि शिक्षण व व्यवसायिक प्रगती या विषयांवर चर्चा झाली. श्री सयाजी झुंजार यांनी समाजहितासाठी नेहमीच कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे आयोजन सुस्थितीत पार पडले असून, उपस्थितांनी संयोजक व आयोजक मंडळाचे आभार मानले.