आमदार रमेश कराड यांच्या वाढदिवसानिमित्त मुरुड ग्रामपंचायतिच्या वतीने उपयोगी वस्तूचे वाटप. - latursaptrangnews

Breaking

Saturday, June 14, 2025

आमदार रमेश कराड यांच्या वाढदिवसानिमित्त मुरुड ग्रामपंचायतिच्या वतीने उपयोगी वस्तूचे वाटप.



आमदार रमेश कराड यांच्या वाढदिवसानिमित्त मुरुड ग्रामपंचायतिच्या वतीने उपयोगी वस्तूचे वाटप. 


मुरुड प्रतिनिधी (श्रीकांत टिळक):- लातूर ग्रामीणचे आमदार रमेश आप्पा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीचे युवा नेते ऋषिकेश कराड यांच्या हस्ते अंगणवाडी साठी साहित्य ठेवण्यासाठी कपाट, सिमेंटचे बाक,गृह उपयोगी स्वच्छता ठेवण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला एक कचराकुंड्या चे वाटप करण्यात आले.


लातूर ग्रामीणचे आमदार रमेश अप्पा कराड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

आमदार रमेश कराड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सदरील कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टीचे ऋषिकेश कराड, सरपंच अमृता नाडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले ,आवश्यक असणारे अंगणवाडी साठी साहित्य ठेवण्यासाठी कपाट, सिमेंटचे बाक,गृह उपयोगी स्वच्छता ठेवण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला दोन कचराकुंड्या , ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात व दत्तनगर शमशानभूमी तसेच चव्हाणवाडी शमशानभूमी ,बस स्थानक व वैदू समाजमंदिर या ठिकाणी वयोवृद्ध लोकांना बसण्यासाठी सिमेंटचे बाक वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमा चे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे नियोजन मुरुडच्या सरपंच अमृता अमर नाडे, उपसरपंच हणमंत नागटिळक, ग्रामपंचायत सदस्य. महेश कणसे, लताताई भोसले, सुरज सूर्यवंशी, बालाजी सवाई, सचिन घोडके, संतोष काळे, वैजनाथ हराळे सर्व कर्मचारी व गावातील नागरिक उपस्थित होते.


No comments:

Post a Comment