मुरुड येथील कुणबी मराठा समाजाच्या विद्यार्थींचा सत्कार सोहळा संपन्न. - latursaptrangnews

Breaking

Saturday, June 14, 2025

मुरुड येथील कुणबी मराठा समाजाच्या विद्यार्थींचा सत्कार सोहळा संपन्न.



 मुरुड येथील कुणबी मराठा समाजाच्या विद्यार्थींचा सत्कार सोहळा संपन्न.  

मुरुड प्रतिनिधी (श्रीकांत टिळक):- सरस्वती फंक्शन हॉल, येथे कुणबी मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थींचा सत्काराचा कार्यक्रमा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहूने कुणबी मराठा सेनेचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ कोळसुरे सर, लातूर चे माजी महापौर सुरेश तात्या पवार, कुणबी मराठा सेनेचे मराठवाडा अध्यक्ष आशोकराव कातळे,सचिव कुणबी सेना  गोविंदराव हालसे,मा शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटराव गंगणे सर, मुख्याध्यापक मुक्ताराम शिंदे सर, प्रा. सौदागर भिसे  , श्रीमती पद्मीनी हवालदार ( क्षीरसागर ) मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू झाला .

         तत्पूर्वी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली तसेच गुजरात येथील विमान दुर्घटनेत मृतृमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

 त्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला ,कुणबी मराठा समाजातील दहावी व बारावीत उत्तीर्ण झालेल्या चाळीस विद्यार्थींचा शाल, श्रीफळ, फेटा, पुष्पहार, ट्राॅफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

           या व्यंकटराव गंगणे सरांनी कार्यक्रमाची रुपरेषा सांगून सर्वजण एकत्र येऊन गेल्या वर्षभरात काय काय कार्यक्रम राबवले याची सविस्तर माहीती दिली. तसेच प्रा सौदागर भिसे सरांनी दहावी बारावी नंतर काय करावे तसेच अभ्यासावर कसा भर द्यावा पालकांनी काय करावे याचे सविस्तर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या त्यां नंतर आशोकराव कातळे यांनीही मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय भाषणातून विश्वनाथ कोळसुरे सरांनी सविस्तर मार्गदर्शन केले .

        या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन  बालाजी धोत्रे यांनी मांडले व सूत्रसंचालन  वैजिनाथ हराळे यांनी केले या कार्यक्रमास दहावी व बारावीतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह आईवडील उपस्थित होते. तसेच मुरुड शहरातील कुणबी मराठा समाजातील सर्व समाजबांधव उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब खराडे,विशाल हवालदार, लिंबराज सुर्यवंशी, शाम खराडे, रवी सूर्यवंशी, बलभीम हवालदार,खंडू कोरडे,आमोल क्षीरसागर,कृष्णा घेंबड, पंजाब पवार, नाना क्षीरसागर, संतोष डांगे,लहू कावळे, हणुमंत इंगळे, अक्षय खराडे,बाळराजे इंगळे,भागवत खराडे,विक्रम खराडे, दिपक नरवडे, पवार साहेब, काकासाहेब देशमुख ,अरविंद हवालदार, बालाजी नरवडे, दिलीप गंगणे, चंद्रकांत सुरवसे, बबन खराडे, धनंजय हवालदार, अजय हवालदार यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला समाजातील असंख्य महीला , पुरुष व मुल, मुली उपस्थित होते.


No comments:

Post a Comment