मुरुड येथील विविध प्रश्न मार्गे लावण्यासाठी उपसरपंचाचे, व सदस्याचे स्थानिक आमदारांना साकडे..!
मुरुड येथील विविध प्रश्न मार्गे लावण्यासाठी उपसरपंचाचे, व सदस्याचे स्थानिक आमदारांना साकडे..!
मुरुड प्रतिनिधी (श्रीकांत टिळक):- मुरुड येथील विविध विषयावर चर्चा करून दत्तनगर भागातील कबाल्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मा.आ.रमेश आप्पा कराड यांच्या सूचना.
लातूर तालुक्यातील मुरुड गावामध्ये मागील 20 ते 30 वर्षापासून असलेल्या कबालाचे प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न केले नव्हते.असे असताना ग्रामपंचायत स्तरावर कसल्याही प्रकारचे प्रस्ताव किंवा मागणी करण्यात आली नव्हती .परंतु मुरुडचे उपसरपंच हनमंत नागटिळक, ग्रामपंचायत सदस्य महेशजी कणसे, लताताई भोसले यांनी स्थानिक आमदार रमेश आप्पा कराड यांच्याकडे या विविध प्रश्न मार्गी लावण्याचे मागणी करण्यात आली आहे.
तसेच मागील अनेक वर्षांपासून मुरुड गावातील अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले,लातूर ग्रामीणचे आमदार मा.रमेश आप्पा कराड यांनी लातूरचे तहसीलदार तांदळे , लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांना बोलावून मुरुड येथील दत्तनगर भागातील कबाल्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा जेणेकरून गोरगरीब नागरिकांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेता येईल. मुरुड येथील परिवाराला प्रत्येक शासनाच्या योजना प्रत्येक नागरिकाला मिळाव्या व त्यामधून वंचित राहू नये त्यासाठी योग्य ते निर्णय घ्यावी अशी मागणी उपसरपंच ,सदस्य यांनी केली होती.
गटविकास अधिकारी, तहसीलदार यांना आमदाराच्या सूचना.
* मुरुड या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव तयार करून शासन दरबारी पाठवावे म्हणजे ते मंजूर करून घेता येईल .
* मुरुड परिसरातील शिवरस्ते तात्काळ मोकळे करून घ्यावेत,
* मजबुतीकरण करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा जेणेकरून मुरुड मध्ये होत असलेली वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल.बायपास करण्यासाठी होत असलेली मुरुड करांची मागणी व त्यासाठी करावे लागणारे भूसंपादन साठी लागणारा निधी व वेळ या ऐवजी शिवरस्ते मोकळे केले तर वाहतुकीची सोय होईल.
अशा अनेक प्रश्नांवर तात्काळ उपाययोजना कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या,
याप्रसंगी मुरुडचे प्रश्न मांडण्यासाठी ग्रामपंचायतचे उपसरपंच हणमंत बापू नागटिळक, ग्रा.पं.सदस्य महेश कणसे, सौ.लताताई भोसले ,कार्यकर्ते उपस्थित होते. अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य महेशजी कणसे यांनी दिली

No comments