Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    प्रभाग 03 मध्ये एम आय एम यांच्या पाठीशी उभी राहिली जनशक्ती..




     प्रभाग 03 मध्ये एम आय एम यांच्या पाठीशी उभी राहिली जनशक्ती..


    ● मतदारांची प्रचंड सहानुभूती; प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद व असंख्य  नागरिकांचा जाहीर प्रवेश..


    परळी वैजनाथ : परळी  नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्र. 3 मध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी सरळ लढत निर्माण झाली आहे. धनशक्तीला डावलून प्रभागातील नागरिकांनी सर्वसाधारण गटातील  एम आय एम चे उमेदवारांच्या पाठीशी जनशक्ती उभा केल्याचे शुक्रवारी झालेल्या प्रचार रॅलीतून स्पष्ट झाले. मतदारांचा मोठ्या प्रमाणात कल झुकलेला रॅलीतून दिसून आले.यावेळी सय्यद सादेक, समीर खातीब, असलम खान, सय्यद असद, असलम पठाण, जानी खान, मुशीर कुरेशी, शेख अजिम , शेख वाजेद, बाबू शेख, खाजा शेख, आधी असंख्य कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला


    बरकत नगर एकबाल नगर खुदबे नगर सह जमजम पार्क  परिसरात काढण्यात आलेल्या रॅलीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उमेदवारांचे स्वागत करत मतदार राजाची सहानुभूती स्पष्टपणे दर्शवली. अनेक मतदारांनी प्रत्यक्ष भेटीत मतदानाचे आश्वासन देत एम आय एम यांच्या बाजूने सार्वजनिक पाठींबा जाहीर केला.






    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad