दिवसभरातील ताज्या घडामोडी , पुणे अपघात, आरटीओत तपासात मोठा खुलासा

www.latursaptrangnews.com
By -
0

 (दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका  क्लिकवर ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk 



💥 पुणे अपघात, आरटीओत तपासात मोठा खुलासा :


पुण्यातील नवले पूलावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर झालेल्या अपघातात टँकर चालकाने 48 वाहनांना धडक दिली. टँकरचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचं बोललं जात होतं. मात्र तपासादरम्यान यामागे दुसरं कारण असल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना झाली नसल्याचं समोर आलं आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीनंतर ही माहिती समोर आली आहे.


😎 महात्माजींचे पणतू तुषार गांधींचा आरोप :


स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केवळ इंग्रजांनाच मदत केली नाही, तर बापूंच्या हत्येसाठी बंदूक पुरवली, असा गंभीर आरोप महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केला. त्यामुळे पुन्हा एकदा गांधी विरुद्ध सावरकर असा वाद पेटण्याची शक्यताय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतेच भारत जोडो यात्रेत सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली असा आरोप केला होता. त्यानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपाची एकच राळ उडाली. आता या वादात तुषार गांधी यांनी ट्विट करून उडी घेतली.


👀 संभाजीराजे छत्रपतींचा फडणवीसांना सवाल :


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांची पाठराखण का करीत आहेत?, असा संतप्त सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला. सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली, असे वक्तव्य केलेच नाही, असेही फडणवीस म्हणाले. त्यावर संभाजीराजेंनी संताप व्यक्त करत दोघांची पाठराखण करण्यापेक्षा त्यांना माफी मागायला लावा, असे फडणवीसांना उद्देशून म्हटले.


🗣️ माफी मागा, नाहीतर स्वत:लाच जोडे मारा; शिवसेनेचा हल्लाबोल :


छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील नायक झाले असल्याचे सांगत नवा वाद निर्माण करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर शिवसेनेने सडकून टीका केली आहे. शिवसेनेने राज्यपालांच्या वक्तव्यावरून भाजप आणि शिंदे गटावरही निशाणा साधला आहे. शिवरायांचा अपमान करणार्‍यांना महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल, असे शिवसेनेने म्हटले आहे. 


🧐 मुलींनी साडी नेसण्याच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण :


खासदार सुप्रिया सुळे यांनी चॅनेलमधील मुलींनी साडी नेसण्याबद्दल विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावरून अनेक राजकीय नेत्यांनी टीका केली होती. दरम्यान, या टीकेवर आता सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे. टीका करणं चुकीचं नाही, तो त्यांचा अधिकार आहे, असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी राज्यपालांच्या विधानाचाही निषेध केला. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी यांसदर्भात प्रतिक्रिया दिली.

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)
3/related/default