'भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला, रोहित पवारांचा हल्लाबोल :
आता राज्यसभा खासदार आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत वादग्रस्त वक्तव्य केलं..ते म्हणाले, 'शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे पाच वेळेस माफी मागितली', या वक्तव्या विरोधात अवघ्या महाराष्ट्रातून टीकेची झोड उठत आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील ट्विट करत भाजपवर कडक शब्दात टीका केली.
🗣️ शिवरायांचा अपमान भाजपला मान्य आहे का? राऊतांचा सवाल :
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफिच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण तापले असताना दुसरीकडे भाजप प्रवक्त्यांनी शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे पाच वेळेस माफी मागितली असल्याचे वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. औरंगजेबाची माफी शिवाजी महाराजांन मागितली असं विधान भाजपच्या प्रवक्त्यांनी केलंय, हे भाजपला मान्य आहे का? असा सवाल करताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
📝 पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल :
पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी आणखीन एक पुरवणी आरोपपत्रदाखल केलं आहे. यात व्यावसायिक राज कुंद्रासह अन्य आरोपींविरोधात आणखीन काही पुरावे पोलिसांनी कोर्टात सादर केले आहेत. मुंबई पोलिसांनी मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टात हे पुरवणी आरोपपत्र सादर केलं. याप्रकरणी राज कुंद्राला जुलै 2021 मध्ये अटक झाली होती.
💸 राज्यपालांचे धोतर फेडणाऱ्यास 1 लाखांचं बक्षीस :
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श असल्याचे सांगितले. त्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदीप काळे यांनी शहरातील विविध ठिकाणी बॅनर लावून त्या विधानाचा निषेध नोंदविला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच धोतर फाडणार्यास किंवा फेडणार्यास 1 लाख रोख रक्कम दिली जाईल अशी टीप या फ्लेक्सवर लिहिण्यात आली.
🏏 MS Dhoni च्या खांद्यावर जबाबदारी सोपवणार :
आयसीसी स्पर्धेतील अपयशानंतर बीसीसीआय आता कठोर पाऊलं उचलण्याच्या पवित्र्यात दिसत आहेत आणि आता पुढील मोर्चा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड कडे वळणार असल्याची चर्चा आहे. 2024च्या वर्ल्ड कपचा विचार लक्षात घेता युवा खेळाडूंचा संघ तयार करण्यावर भर असल्याची चर्चा आहे आणि त्यांचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात येणार आहे. हार्दिक व धोनी यांच्यातलं बॉडिंग फार चांगले आहे आणि त्यामुळेच महेंद्रसिंग धोनीला टीम इंडियाचा संचालक म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.
No comments:
Post a Comment