Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर



    😎 हिवाळी अधिवेशनात 21 विधेयके मांडली जाणार :


    विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाचे बिगुल वाजले असून मंगळवारी मुंबईत झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत दोन आठवड्याचा (10 दिवस) कार्यकाळही निश्चित करण्यात आला आहे. अधिवेशनात 21 विधेयके मांडली जाणार असून त्यावर चर्चा अपेक्षित आहे. दरम्यान, विधिमंडळ इमारत परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.


    🗣️ सीमावादावर अमित शहा यांनी ठोस भूमिका घ्यावी... :


    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोल्हापूर ही सासरवाडी आहे. त्याच्या सासरवाडीलाच सीमावादाचे सर्वाधिक चटके बसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर अमित शहा यांनी ठोस भूमिका घ्यावी, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. आज अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी सीमावादावर दिल्लीत चर्चा करणार आहेत. यापार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत राऊत यांनी कर्नाटक तसेच, शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली.


    😇 राज्यात अघोषित आणीबाणी लादण्याचा प्रयत्न! :


    कोबाड गांधी यांच्या 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम' या पुस्तकाला जाहीर झालेला अनुवादाचा पुरस्कार रद्द केल्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. अजित पवार म्हणाले, राज्य सरकारचा साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप निषेधार्ह आहे. आणीबाणीच्या काळात असा प्रकार झाला होता. त्याच पद्धतीने राज्यात आता अघोषित आणीबाणी लादण्याचा प्रयत्न केला जात आहे.


    🤝 RBIचे माजी गव्हर्नर भारत जोडो यात्रेत सहभागी :


    RBI चे माजी गव्हर्नर एन रघुराम राजन आज राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सामील झाले आहेत. राहुल गांधी यांनी राजन यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. चहाच्या ब्रेकपर्यंत दोघेही सतत बोलत होते. रघुराम राजन हे आर्थिक मुद्द्यांवर स्पष्ट मत मांडत आहेत. भारत जोडो यात्रेत विविध भागातील लोक सातत्याने सामील होत आहेत हे विशेष.


    ⚽ लिओनेल मेसीकडून निवृत्तीची घोषणा :


    अर्जेंटिनाने क्रोएशियावर 3-0 अशी मात करत सहाव्यांदा विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान हा अंतिम सामना अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेसीचाही शेवटचा सामना असणार आहे. मेसीने या सामन्यानंतर आपण निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं आहे. मेसीने या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत पाच गोल केले असून, अर्जेंटिनाचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे. मेसीच्या नावावर आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये 11 गोल केल्याचा रेकॉर्ड आहे.


    🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


    ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

    📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lets Talk ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk

    ➖➖➖➖➖➖➖➖➖➖


    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad