Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    दिवसभरातील ताज्या घडामोडी

     


    दिवसभरातील ताज्या घडामोडी



    💥 आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला अपघात :


    भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला पुणे-पंढरपूर रोडवर भीषण अपघात झाला. या मार्गावरुन मलठण जवळून गाडी जात असताना पुलावरुन कोसळली. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. यात आमदार गोरे किरकोळ जखमी झाले असून त्यांना पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर त्यांच्या सोबत असलेल्या चार व्यक्तींवरही उपचार सुरू आहे.


    🗣️ सीमावादावर दीपक केसरकरांची सारवासारव :


    कर्नाटकात विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे सीमावादावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा नाईलाज असेल, अशी अजब प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून बसवराज बोम्मई सातत्याने महाराष्ट्राला डिवचत असताना मंत्री दीपक केसरकर हे बोम्मईंची पाठराखण का करत आहेत?, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.


    💉 5 देशांतून येणाऱ्या लोकांसाठी RT-PCR अनिवार्य :


    चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य असेल, असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी सांगितले. या देशांतील कोणत्याही प्रवाशामध्ये कोविड-19 ची लक्षणे आढळल्यास किंवा चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास या लोकांना क्वारंटाइन केले जाईल.


    🔎 CM एकनाथ शिंदेंकडून बोहणीचा भ्रष्टाचार :


    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सरकारचा बोहणीचा भ्रष्टाचार केलाय. त्यांनी गरिबांच्या वाट्याचे तब्बल 110 कोटींचे भूखंड 2 कोटींना दिले. ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारधारेची फसवणूक आहे, असा घणाघात शनिवारी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. ते नवी दिल्लीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.


    🏥 माजी मंत्री सुरेश जैन यांची प्रकृती बिघडली :


    जळगाव घरकूल घोटाळाप्रकरणी चर्चेत असलेले माजी मंत्री सुरेश जैन यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना तातडीने एअर अ‍ॅम्ब्युलन्समधून मुंबईला हलवले असून, त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरूयत. घरकूल घोटाळाप्रकरणी जैन यांना नुकताच नियमित जामीन मंजूर झालाय. तुरुंगातून सुटेनंतर त्यांचे जळगावमध्ये अभूतपूर्व स्वागत झाले. मात्र, आता त्यांची प्रकृती बिघडल्याचे समोर आलेय.


    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad