Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    दिवसभरातील ताज्या घडामोडी



     पंकजा मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा गौप्यस्फोट :


    भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं गौप्यस्फोट केला असून, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपच्याच नेत्यांकडून पंकजा मुंडेंना बदनाम करण्याचा कट रचला जात असल्याचं बावनकुळे म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. 


    😎 CM शिंदेंचा शरद पवारांसमोर सुप्रिया सुळेंना टोला :


    कुणी काहीही म्हणो. दावोसमध्ये राज्यात मोठी गुंतवणूक झाली आहे, असा टोला सुप्रिया सुळेंचे नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. पुण्यातील मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट येथील 46 व्या सर्वसाधारण सभा आणि पुस्तकार वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार हेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते.


    🗣️ सोमय्या यांचा मुंबई महापालिकेवर आणखी एका घोटाळ्याचा आरोप :


    पोपट काही खात नाही, पोपटाला काही ऐकायला येत नाही, पोपट पाणी पित नाही. पोपट पेरू खात नाही, असे काही अहवालात म्हटलेले नाही. तसेच पोपट मेलाय असे देखील म्हटलेले नाही. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी नेमलेल्या समितीवर आरोप करताना किरीट सोमय्या यांनी पोपटाचे उदाहरण दिले. मुंबई महापालिकेवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.


    😆 'ज्यांच्या तोंडी नेहमी साखर असते ते शरद पवार' :


    वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 46 वी वार्षिक सर्वसाधारण सभेला मांजरी बुद्रुक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणाची सुरवात करताना म्हणाले की, ज्यांच्या तोंडी नेहमी साखर असते ते शरद पवार साहेब. तसेच जयंत पाटील यांच्याही तोंडात साखर असते. असे म्हणताच कार्यक्रमाच्या ठिकाणी एकच हशा पिकला.


    💐 ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन :


    ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते नाट्य-चित्रपट निर्माते अंबर कोठारे (वय 96) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. श्री. कोठारे यांच्या पार्थिवावर बोरिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं निधन झालंय, अशी माहिती त्यांची नातसून उर्मिला कोठारेने दिली. त्यांच्या मागे पत्नी जेनमा, पुत्र आणि प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे, नातू आदिनाथ कोठारे असा परिवार आहे.


    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad