खुशखबर! ऐन लग्नसराईच्या तोंडावर सोनं झालं स्वस्त; चांदीचा भावही घसरला

www.latursaptrangnews.com
By -
0

 






खुशखबर! ऐन लग्नसराईच्या तोंडावर सोनं झालं स्वस्त; चांदीचा भावही घसरला


Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५१,५०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५१,७०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६७,५०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ६८,३०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५१,५०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५६,१८० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,५०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,१८० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,५०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,१८० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,५३० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,२१० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६७५ रुपये आहे.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)
3/related/default