Subscribe to:
Post Comments (Atom)
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने म्हणजेच आलियाने अभिनेत्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे.
आलियाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
आलियाने इस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीमध्ये ती नवाजुद्दीनवर गंभीर आरोप करताना दिसत आहे.
आलिया म्हणतेय,"नवाजुद्दीन माझ्या लेकरांना माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला आता मुलांचा ताबा हवा आहे. पण मला आता आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे".
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दीन आणि त्याची पत्नी आलियाचे मतभेद सुरू आहेत.
आलियाने नवाजुद्दीनवर गैरवर्तन, जेवण न देणे, खोलीत बंद करणे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च न उचलणे असे अनेक आरोप केले आहेत.
आलियाने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"एक उत्कृष्ट अभिनेता स्वत:ला माणूस बनवण्याचा प्रयत्न करत आहे".
आलिया नवाजुद्दीनवर वर्सोवा पोलीस ठाण्यात पुराव्यासह बलात्काराची तक्रार दाखल केली आहे.
आलिया म्हणतेय,"माझ्या लेकरांसाठी मी काहीही करायला तयार आहे. पण त्या दुष्ट माणसाकडे देणार नाही".
No comments:
Post a Comment