Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    बायकोचा अंडा फ्राय बनवून देण्यास नकार; संतापलेल्या नवऱ्याने केलं...

     


    बायकोचा अंडा फ्राय बनवून देण्यास नकार; संतापलेल्या नवऱ्याने केलं..


    बीड : पती-पत्नीमधील वाद काही नवे नाहीत. प्रत्येक पती -पत्नीत भांडणं हे होत असतात. जेवणात काही कमी जास्त झालं तर पती पत्नीवर ओरडत असतो. पण बीडमध्ये एका पतीने तर चक्क हद्दच केली. त्याच्या बायकोने त्याला अंडा फ्राय दिलं नाही म्हणून तिला भयंकर शिक्षा दिली असल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. बीडमधील अंबाजोगाई येथील ही धक्कादायक घटना आहे.

    पतीने आपल्या पत्नीला अंडा फ्राय बनवायला सांगितलं. पण तिने त्याला नकार दिल्याने त्याला राग अनावर झाला आणि त्याने धक्कादायक पाऊल उचलले. आपल्या पत्नीने अंडा फ्राय बनवून खायला दिलं नाही म्हणून तो प्रचंड संतापला. त्याने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. आरोपी पतीने तिच्या डोक्यावर जोरदार काठीने वार केला आणि त्यात ती गंभीर जखमी झाली.

    हा वाद शेवटी पोलीस ठाण्यात पोहोचला. अंडा फ्रायवरुन पतीने मारहाण केल्यानंतर पत्नीने पोलीस ठाणे गाठत आपल्या पतीविरोधात तिने तक्रार दिली. पत्नीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, क्षुल्लक कारण हे जिवावर देखील बेतू शकतं हे या वादातून पुढे आलं आहे. या वादामध्ये हसावं की किती गांभीर्याने या गोष्टीकडे लक्ष द्यावे हे मात्र अवघड आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad