भीषण अपघातात १० जण ठार
Ten died in two accident in Beed: बीडमध्ये दोन वेगवेगळ्या अपघात १० जण ठार झाले आहे. एका अपघातात रुग्णवाहिकेने ट्रॅव्हलला धडक दिली यात चार तर दुसऱ्या अपघातात ट्रॅव्हल बस उलटल्याने ६ जण ठार झाले.
Ten died in two accident in Beed: बीड जिल्ह्यात मध्यरात्री आणि आज पहाटे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात १० जण ठार झाले. पहिला अपघात हा मध्यरात्री रुग्णवाहिकेचा झाला असून यात चार नागरीक ठार झाले. तर दुसऱ्या अपघातात चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक खासगी ट्रॅव्हल बस उलटली असून यात ६ जण ठार झाले.
मिळालेल्या माहितीनुसार पहिला अपघात हा मध्यरात्री झाला. हा अपघात बीड- अहमदनगर महामार्गवर घडला. यात एका ट्रकला ॲम्बुलन्सने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात दौलावडगावजवळ रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान घडला. एक रुग्णवाहिका ही अहमदनगरकडे जात असलेल्या एका ट्रकला पाठीमागून जोरात धडकली. या भीषण अपघातात रुग्णवाहिकेतील डॉक्टरसह चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर, एकजण गंभीर जखमी झाला आहे.
रुग्णवाहिका चालक भरत सिताराम लोखंडे (वय ३५, मनोज पांगु तिरपुडे, पप्पु पांगु तिरखुंडे (दोन्ही रा. जाट देवळा, ता. पाथर्डी) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर डॉ. राजेश बाबासाहेब झिंजुर्के (वय ३५, रा. सांगवी पाटण, ता. आष्टी) यांचा मॅक केअर हॉस्पिटल, अहमदनगर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याच बरोबर ज्ञानदेव सूर्यभान घुमरे, (वय ४५, रा. घाटा पिंपरी, ता. आष्टी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदनगर येथे उपचार सुरू आहेत.
दूसरा अपघात हा आज गुरुवारी सकाळी ६ वाजता अहमदनगर-बीड राष्ट्रीय महामार्गावर आष्टा फाटा येथे घडला. या अपघातात एका खासगी ट्रॅव्हल बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल उलटून ६ प्रवाशांचा मृत्यू झाला तर काही प्रवासी हे जखमी झाले. अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत प्रवाशांना नगर आणि बीड येथे रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे समजू शकली नाही.
No comments:
Post a Comment