Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    लिंगायत समाजाच्या आरक्षणासाठी आता लिंगायत समाज राजकीय पुढार्‍यांना जाब विचारणार-प्रा.सुदर्शनराव बिरादा

     लातूर ः लिंगायत समाजाच्या आरक्षणासाठी आता लिंगायत समाज हा राजकीय पुढार्‍यांना लिंगायत महासंघाच्यावतीने गावागावामध्ये जाब विचारणार असल्याचे लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी सांगितले. लिंगायत समाजाला सरसकट आरक्षण लागू करावे या मागणीसाठी 2014 साला पासून समाज प्रयत्न करीत आहे. मात्र सरकारकडून लिंगायत आरक्षणाचा 2014 सालापासून घोळ सुरू आहे. तीन वेळेला मागील मुख्यमंत्र्यांनी आमच्या बैठका लावल्या. या बैठकांमध्ये आमची भुमिका समजुन घेतली आणि एका महिन्यात आरक्षण देण्याचे जाहीर केले. मात्र हे आरक्षण लिंगायतांना आजपर्यंत मिळाले नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने पुढार्‍यांना गावबंदी केली आहे. ती योग्य असून या आंदोलनास लिंगायत महासंघाचा पाठींबा असल्याचेही प्रा.सुदर्शनराव बिरादार म्हणाले. ज्याठिकाणी मराठा समाज बांधव नाही त्याठिकाणी जर लिंगायत समाजाची संख्या असेल तर त्या ठिकाणी या दोन्ही समाजासाठी आंदोलन हे लिंगायत महासंघाच्यावतीने करण्यात येणार आहे. मराठा समाजातील शेतकरी व गरीब लोकांची जशी आर्थिक परिस्थिती आहे तशीच लिंगायत समाजातील शेतकरी व गरीब लिंगायतांची परिस्थिती आहे. मात्र लिंगायत समाजातील चार श्रीमंत लोकांना व चार पुढार्‍यांना समोर ठेवून समाजाची सामाजिक स्थिती मोजली जाते. हे सरसकट समाजावर अन्यायकारक आहे. शैक्षणिक क्षेत्रात व नौकरीमध्ये मराठा व लिंगायत समाजाला आरक्षणाची खुप गरज आहे. आरक्षण नसल्यामुळे या समाजातील मुलांचे खुप नुकसान होत आहे. सरसकट लिंगायतांना वाणी नावाला असलेले आरक्षण व मराठा समाजालाही त्यांच्या मागणीप्रमाणे लवकरात लवकर आरक्षण लागू करावे तसेच धनगर समाजाच्याही आरक्षणाचा प्रश्‍न शासनाने सोडवावा या मागणीसाठी आता लिंगायत समाजाचे युवक गावागावात पुढार्‍यांना जाब विचारणार आहेत. आमच्या आरक्षणाची बाजू न घेणार्‍या पुढार्‍यांना येणार्‍या निवडणूकीत धडा शिकविला जाईल असा इशारा लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी दिला आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad