ग्रामपंचायत कार्यालय मुरुड येथील ग्रामविकास अधिकारी यांना बडतर्फ करण्यासंदर्भात सदस्यांचा अमरण उपोषणचा इशारा - latursaptrangnews

Breaking

Friday, November 24, 2023

ग्रामपंचायत कार्यालय मुरुड येथील ग्रामविकास अधिकारी यांना बडतर्फ करण्यासंदर्भात सदस्यांचा अमरण उपोषणचा इशारा



 मुरुड (श्रीकांत टिळक) :-  ग्रामपंचायत कार्यालय मुरुड येथील ग्रामविकास अधिकारी यांना बडतर्फ करण्यासंदर्भात आमरण उपोषणचा इशारा दिला आहे,असे पूर्वसूचना पत्र मुरुड ग्रामपंचायत सदस्य मेघराज किशोर अंधारे, सुरज संभाजीराव सूर्यवंशी यांनी जिल्हा अधिकारी कार्यालय लातूर ,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर,तहसीलदार तथा दंडाअधिकारी तहसील कार्यालय लातूर यांना देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, ग्रामपंचायत कार्यालय मुरुड येथील ग्रामविकास अधिकार्‍यांची सखोल चौकशी झालेल्या अहवाला मध्ये त्यांनी मूल्यांकनानुसार येणारी नोंदणी फी भरणा केलेल्या पावत्या मध्ये व्हाइटनर चा वापर करून आर्थिक अपहार केला आहे? ग्रामपंचायत च्या वतीने देण्यात येणारी जाहीर प्रगटना मध्ये नावे न देता बरेच प्लॉटची फेरफार करून तिथेही आर्थिक अपहार केल्याचे दिसून येत आहे? असेही नमूद केले आहे. ग्रामपंचायत च्या फेरफार नोंदणी बाबत नमुना नंबर 7 ची पावती देताना अगोदरची पावती नंतरच्या तारखेत व नंतरची पावती अगोदरच्या तारखेत दिल्याचे दिसत आहे? मागील पत्राच्या अनुषंगाने झालेल्या चौकशी अहवालात व मागील काळात निलंबित केलेल्या असताना फक्त स्थगिती झाली होती परंतु मुरुड येथे नियुक्ती नव्हती तरीही ह्या  ग्रामविकास अधिकारी यांच्यावर शासकीय नियमानुसार कारवाई करावी व तात्काळ बडतर्फ करण्यात यावे, अन्यथा दिनांक 28/ 11/ 2023 सकाळी 11 वाजता मुरुड ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणास बसणार आहेत याची पूर्वसूचना म्हणून सदर पत्र देण्यात आले आहे.तसेच उपोषणास बसण्याच्या ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून उपोषणामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेत आहे, मेघराज अंधारे व सुरज सूर्यवंशी यांनी असे दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment