Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    मुरुड ग्रामपंचायत येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे निमित्ताने उर्वरित शासकीय योजनेतील कागदपत्रे वाटप....




     मुरुड ग्रामपंचायत येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे निमित्ताने उर्वरित शासकीय योजनेतील कागदपत्रे वाटप....


    मुरुड प्रतिनिधी (श्रीकांत टिळक):-  मुरुड ग्रामपंचायत च्या माध्यमातून श्री छत्रपती शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधुन मुरुड येथे महाराजस्व अभियाना अंतर्गत करण्यात आलेले राशन कार्ड व इतर कागदपत्रे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. 


    मुरुड ग्रामपंचायत येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे निमित्ताने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

    तसेच दि . ०५/०३/२०२४ रोजी मा. जिल्हाअधिकारी वर्षाताई ठाकुर / घुगे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराजस्व अभियान अंतर्गत भटक्या विमुक्त जाती जमातीचे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये मुरुड येथील भटक्या समाजातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी जन्म प्रमाणपत्र, राशन कार्ड, विवाह नोंद, मृत्यु नोंद प्रमाणपत्र, मतदान नोंद व केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना मिळवुन देण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते .

    त्या अनुषंगाने आज दि. ०६/०६/२०२४ रोजी श्री छत्रपती

    शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधुन मुरुड ग्रामपंचायतच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड व राशन कार्ड इत्यादी प्रमाणपत्राचे १५० लाभार्थ्यांना मा.उपसरपंच हणुमंत (बापु) नागटिळक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

    कार्यक्रमाचे आयोजन मुरुड ग्रामपंचायतचे सदस्य महेश कणसे (ग्रा.पं.सदस्य) ,अनंत कणसे (ग्रा.पं.सदस्य), सुर्यकांत गाडे (ग्रा.पं.सदस्य),  सुरज सुर्यवंशी (ग्रा.पं.सदस्य),  सचिन घोडके व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी केले होते.

    यावेळी  रवि (आबा) नाडे,गोविंद घुटे, संतोष डांगे, मुकेश सवासे, बळवंत कणसे, हणमंत भोसले व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.


    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad