सामाजिक नेते 'मोहसीन खान'यांना 'मौलाना अबुल कलाम आझाद राष्ट्रीय' पुरस्कार घोषित
दिल्लीत होणार सन्मान
लातूर: लातूर येथील सामाजिक क्षेत्रात जनतेच्या विविध विषयावरती अनोख्या प्रकारे आंदोलन करणारे आंदोलन करते समाजसेवी व स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष माननीय मोहसीन खान यांना नॅशनल कॉन्फरन्स ऑफ मायनॉरिटीच्या वतीने अबुल कलाम आझाद समाजसेवी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे नॅशनल कॉन्फरन्स ऑफ मायनॉरिटी या संघटने कडून विविध राज्यातील सामाजिक चळवळीतील लोकांना हे पुरस्कार प्रदान करीत आहे तेलंगाना,महाराष्ट्र,बिहार,कर्नाटका आदी राज्यातील सामाजिक क्षेत्रात 'उल्लेखनीय' काम करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. लातूर जिल्ह्याचे सुपुत्रमाननीय 'मोहसीन खान' यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून त्यांनी अल्पसंख्यांक दलित पीडित शोषितांच्या प्रश्नावर सतत आवाज उठवलेला आहे विशेषता त्यांच्या आंदोलनाची पद्धत वेगळी व अनोखी असल्याने संबंधित शासन,प्रशासनाकडे लक्ष 'वेधणारी' असते हा पुरस्कार दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, संसद मार्ग,दिल्ली येथे दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी तामिळनाडूचे मुख्यमंत्री माननीय एम.के स.टालिन यांच्या हस्ते व विविध राज्यातील खासदार माननीय खासदार चंद्रशेखरजी आझाद,माननीय वर्षाताई गायकवाड,माननीय सुजिंदर सिंग रंधवा,मौलाना मोहिबुल्लाह नदवी,माननीय रिचर्ड वनमहंगाणीया यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
0 Comments