रोटरीच्या चित्रकला स्पर्धेत ५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

www.latursaptrangnews.com
By -
0

रोटरीच्या चित्रकला स्पर्धेत 
५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग  

स्पर्धेचे २८ वे वर्ष 

रोटरी क्लब ऑफ लातुर मिडटाऊनचा विक्रमी उपक्रम 

लातूर/प्रतिनिधी:रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने  लातूर शहरातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेत ५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.स्पर्धेचे हे विक्रमी २८ वे वर्ष आहे.
   कोरोना काळात दोन वर्षांपासून खंडित झालेली ही स्पर्धा या वर्षी उत्साहात पार पडली.श्रीकिशन सोमाणी विद्यालयात रविवारी (दि.२० नोव्हेंबर)आयोजित या स्पर्धेत शहरातील १०० पेक्षा जास्त शाळेतील ५ हजार विद्यार्थी सहभागी झाले.जवळपास २२५  मूकबधिर व दिव्यांग  विद्यार्थ्यानीही स्पर्धेत सहभाग घेतला.
   या स्पर्धेचे उद्घाटन बालरोग तज्ञ डाॅ.अशोक आरदवाड याच्या हस्ते करण्यात आले.यावेळी रोटरीच्या नियोजित प्रांतपाल स्वाती हेरकर व माजी प्रांतपाल बाळ इनामदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या स्पर्धेचे प्रोजेक्ट चेअरमन म्हणून पवन मालपाणी व किशन कुलेरिया यांनी काम पाहिले.या कार्यक्रमास चापसी सायकल एजन्सीचे नितीन चापसी,एस.के. बाईकचे प्रविण मुळे यांचीही उपस्थिती होती.या स्पर्धेसाथी शशिकांत मोरलावार,रवी जोशी, सचिन मालू ,विशाल अयाचित, अमोल दाडगे,श्रीनिवास भंडे, कलश मुंदडा,मोतीलाल वर्मा, अमोल बनाळे,चंद्रकांत गस्तगार,  अविनाश भोसले यांच्यासह सर्व रोटेरियन व श्रीकिशन सोमाणी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.बक्षिसासाठी असणाऱ्या १० सायकलचे प्रायोजकत्व चापसी सायकल एजन्सी यांनी दिले.





Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)
3/related/default