लातूर जिल्हा लॅबोरेटरी संघटनेच्यावतीने कर्नल डॉ.जी.पी.अणदूरकर यांना आदरांजली

www.latursaptrangnews.com
By -
0


लातूर ः लातूर जिल्हा लॅबोरेटरी संघटनेच्यावतीने वैद्यकीय क्षेत्रात आपल्या कार्यातून एक आगळी-वेगळी छाप पाडणारे डॉ.भालचंद्र ब्लड बँकेत वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असणारे डॉ.जी.पी.अणदुरकर यांचे शनिवारी दि.19 नोव्हेंबर रोजी दुःखद निधन झाले. त्यांना रविवारी लातूर जिल्हा प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्यावतीने भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी दिवंगत कर्नल जी.पी.अणदुरकर यांच्या आठवणींना उजाळा देत दत्तात्रय अपसिंगेकर यांनी डॉ.जी.पी.अणदुरकर यांच्या कार्याचा उजाळा दिला. ते शिस्तप्रिय व तरूणांना नेहमी मार्गदर्शन करण्यासाठी तसेच लातूर जिल्ह्यात जास्तीत जास्त रक्तदान शिबीरे घेवून गरीब रूग्णांना मोफत रक्त कशा पध्दतीने मिळवून देता येईल यासाठी मेहनत घेणारे म्हणून ओळखले जायचे. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या आठवणींनी उजाळा दिला. या आदरांजली सभेस नवजीवन लॅबचे दत्तात्रय अपसिंगेकर,विजयालक्ष्मी अपसिंगेकर, होळकुंदे, लातूर जिल्हा लॅबोरेटरीचे अध्यक्ष शंकर काळे, विनोद लोमटे, प्रदीप शिंदे, विनोद मानकोस्कर, महेश पटणे, दिलीप आरळीकर, रूद्र क्लिनीकल लॅबोरेटरीचे हिराप्रकाश कांबळे, प्रल्हाद माने, सोनटक्के, अवधूत मगर, पांडूरंग बालवाड, महेश मुंडे, सुमित गावडे, गणेश देशमुख, दिलीप बंडगिरे, राहुल पुट्टेवाड, अविनाश मुळे, मसुद कादरी, एजाज शेख, सलीम शेख, बजरंग हेंबाडे, भागवत पिंगलकर, अतिख शेख, सत्तार ताशेवाले, विश्‍वजीत गव्हाणे, अय्याज सय्यद, जगदीश सावळकर, ज्योतिब पवळे, अनिल उगिले, प्रीतम ढगे, चाफेकर विवेक, महेश निटूरे, आरती राठोड, प्रियंका ओकाळे, मनीषा स्वामी, यांच्यासह अनेक तंत्रज्ञ बाधवांची उपस्थिती होती.



Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)
3/related/default